महिलेच्या आयुष्यातील महिन्यातील ‘ते’ पाच दिवस हे खूप महत्त्वपूर्ण असतात. वयात आलेल्या प्रत्येक मुलीला मासिक पाळी येते. या मासिक पाळीच्या पहिल्या दोन दिवसांत प्रत्येकीला त्रास सहन करावा लागतो. आधीच्या काळात पाळीच्या दिवसांत कोणतेही काम करु दिले जाऊ देत नव्हते. मात्र काळानुसार ही गोष्ट सामान्य झाली आहे. पण महिलांचा त्रास हा आहे तसाच आहे. काळानुसार आजची प्रत्येक स्त्री ही घराबाहेर जाऊन काम करताना दिसते. कामाच्या ठिकाणी तिला मासिक पाळीच्या दिवसांमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच आता काम करणाऱ्या महिलांनी या विरोधात याचिका दाखल केली आहे. (bollywood actress on menstrual leave)
मासिक पाळीच्या दिवसांत प्रत्येक महिलेचा त्रास हा वेगवेगळा असतो. कोणाला कमी त्रास होतो तर कोणाला जास्त त्रास होतो. मात्र त्रास होत असूनही काही महिलांना कामावर जावे लागते. याबाबत मागील वर्षी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयात महिलांसाठी शाळा व ऑफिसमध्ये मासिक पाळीची सुट्टी मागितली होती. अशातच आता यावर काही अभिनेत्रींनी यावर त्यांचे मत मांडले आहे.
मासिक पाळी सुट्टी या विषयावर याआधी अभिनेत्री आलिया भट्टने आपले मत मांडले होते. ती म्हणाली होती की, “आपण महिलांना मासिक पाळीच्या दिवसांत एक दिवस सुट्टी किंवा घरुन काम करण्याची करण्याची परवानगी देत नाही आहोत का? आमची शारीरिक सहनशिलता तितकीच आहे जितकी आम्ही सहन करु शकतो. पण आता लोक वेळेनुसार बदलले आहेत. आम्ही समान आहोत पण एकसारख्या नाही”.
अभिनेत्री तापसी पन्नूने देखील मासिक पाळीची सुट्टी यावर भाष्य केले आहे. ती म्हणाली की, “जर केवळ चुकीच्या गोष्टी बंद असत्या आणि आम्हाला काम करु दिले नसते. जर सॅनिटरी पॅड उघडपणे घेऊन जाता आले नसते तसेच रॅशेसची चिंता करणारे असतो. जर मासिक पाळीची सुट्टी मिळणे सामान्य असते आणि हा केवळ दोन दिवसांचाच प्रश्न आहे की मला सध्या मासिक पाळी आली आहे. पण मी आता डाउन आहे याव्यतिरिक्त मी आराम करत आहे असे बोलायला आवडेल”.
कंगना रणौतने देखील या प्रकरणावर भाष्य केले आहे. ती म्हणाली की, “काम करणाऱ्या महिला एक मिथक आहे. भारतात आजही काम न करण्याऱ्या महिला आहेत. शेती,घरकाम तसेच मुलांना सांभाळण्यापर्यंत अशी अनेक कामं करतात. आजपर्यंत पाळी हा विषय एक वैद्यकीय आजार म्हणून घोषित केला जात नाही तोपर्यंत महिलांना सुट्टीची गरज नाही. पाळी हा आजार किंवा विकलंगता नाही हे लक्षात घ्या”.
सध्या हिना खान स्तनाच्या कर्करोगाचा सामना करत आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र याआधी तिने पाळी या विषयावर भाष्य केले होते. ती म्हणाली की, “पाळीच्या दरम्यान आम्ही नाही म्हणून शकत असा काही पर्याय आपल्याकडे असता तर चांगले झाले असते. या दिवसांत खूप समस्यांना समोरे जावं लागतं”.
सनी लिओनीनेदेखील तिचे मत मांडले आहे. तिने सांगितले की, “जर महिन्यात पाच सुट्ट्या मिळाल्या तर वर्षभरात ६० सुट्ट्या होती. यामुळे कामात नुकसान सहन करावे लागेल. जर पाळीचा शरीरावर काही परिणाम होणार नसेल तर सुट्टी घेण्याची गरज नाही”.दरम्यान काही अभिनेत्रीनी या विषयाला पाठिंबा दिला आहे तर काही अभिनेत्रींचा विरोध असल्याचेदेखील पाहायला मिळत आहे.