बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. बरेचदा ती पापराजींशी भांडताना दिसते, त्यामुळे लोक तिला दुसरी जया बच्चन असेही म्हणू लागले आहेत. अशातच आता तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. समोर आलेला हा व्हिडीओ एका इव्हेंटमधील आहे. तापसीसुद्धा या इव्हेंटमध्ये गेली होती आणि त्यावेळी स्पॉट होताना ती पॅप्सला काहीतरी बोलताना दिसली. अभिनेत्रीच्या समोर आलेल्या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर तिच्यावर पुन्हा टीका होऊ लागली. (Taapsee Pannu Angry)
तापसी पन्नूच्या ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ या चित्रपटाचा प्रीमियर सोहळा गुरुवारी, ८ ऑगस्ट रोजी मुंबईत झाला. आजपासून हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे. प्रीमियरच्या रात्री, अभिनेत्री पॅप्ससमोर छान पोज देताना दिसली. पण तिथून बाहेर पडताना ती वेगळ्याच मूडमध्ये दिसली. अभिनेत्रीचा हे वागणं पाहून परिस्थिती गंभीर झाली आणि पापराजींनाही माफी मागावी लागली. तरीसुद्धा अभिनेत्रीचा राग हा वाढलेला दिसला.
व्हिडीओमध्ये असं पाहायला मिळत आहे की, तापसी पन्नू थिएटरच्या मागील गेटमधून निघून जाताना दिसत आहे. यावेळी, तिच्या बरोबर सुरक्षा कर्मचारीदेखील आहेत, जे तिला कारपर्यंत सोडताना दिसत आहेत. यादरम्यान असे झाले की फोटोग्राफरने अभिनेत्रीचा क्लोज शॉट घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे अभिनेत्री खूप घाबरली आणि तिला अस्वस्थ वाटू लागले. अभिनेत्री जोरात ओरडून म्हणाली, “चढू नकोस. चढून येत आहेस की मला घाबरवत आहेस”. तापसी तिच्या कारजवळ पोहोचताच, इतर पापराजींनी त्या फोटोग्राफरला सॉरी म्हणण्यास सांगितले.
तेव्हा एका पापाराझीने तापसी पन्नूला सांगितले की, त्या व्यक्तीने माफी मागितली आहे, तेव्हा अभिनेत्रीने ‘धन्यवाद’ असे उत्तर दिले. पण तिचं समाधान झालं नाही. यावर एका यूजरने लिहिले की, “नवीन जया बच्चन बनणार आहेत”. तर एकाने लिहिले की, “मजा येईल जेव्हा सर्व पापाराझी तोंड फिरवतील आणि मॅडम येताच तिच्याकडे दुर्लक्ष करतील”. तर आणखी एकाने लिहिले आहे की, “तुम्हाला सॉरी का म्हणायचे ही कोण आहे?, कोणती राणी आहे?”. तर एकाने लिहिले, “ती नेहमीच अति शहाणपणा करत असते”. तर आणखी एकाने म्हटलं की, “बहिष्कार टाका, तिची ही वृत्ती खाली येईल”.