शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रवीना टंडनवर मुंबईत का झाला हल्ला? ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमागील नेमके सत्य काय? भांडणाचे खरे कारण आले समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 2, 2024 | 6:39 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bollywood actress Raveena Tandon in the attacked in Mumbai the exact reason behind come to light.

रवीना टंडनवर मुंबईत का झाला हल्ला? ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमागील नेमके सत्य काय? भांडणाचे खरे कारण आले समोर

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनबद्दल नुकतीच एक बातमी समोर येत आहे. रवीना टंडनचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामुळे रवीना व तिच्या ड्रायव्हरवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी, १ जून रोजी रात्री उशिरा रवीनावर मुंबईतील वांद्रे परिसरात तीन जणांवर अत्याचार आणि मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. या व्हिडीओमध्ये काही स्थानिकांनी रवीना टंडनला घेरल्याचं दिसून येत आहे. कार पार्किंगवरून हा वाद झाल्याचं सांगितलं जात आहे.

अभिनेत्री रवीना टंडनचा हा व्हिडीओ मोहसीन शेख नावाच्या एका व्यक्तीच्या इन्स्टाग्राम व ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये रवीना टंडन काही व्यक्तींशी वाद घालत असल्याचं दिसत आहे. तसेच, काही व्यक्तींनी तिच्याबरोबर धक्काबुक्कीही केल्याचं दिसत आहे. यावेळी झालेल्या वादात रवीना टंडन समोरच्या व्यक्तीला “तुम्ही मला असं ढकलू शकत नाही”, असं वारंवार सांगताना दिसत आहे. तसेच, समोरच्या व्यक्तीने पोलिसांना बोलावण्याचा इशारा देताच रवीनानेही मी पोलिसांना बोलावलं आहे, असं सांगितल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Allegations of Assault by #RaveenaTandon & her driver on elderly Woman Incident near Rizvi law college, family Claims that @TandonRaveena was under influence of Alcohol, women have got head injuries, Family is at Khar Police station @MumbaiPolice @CPMumbaiPolice @mieknathshinde pic.twitter.com/eZ0YQxvW3g

— Mohsin shaikh 🇮🇳 (@mohsinofficail) June 1, 2024

अशातच आता याबद्दल आणखी माहिती समोर आलेली आहे. ‘न्यूज 18’च्या एका स्त्रोतानुसार “हा भाग ज्या प्रकारे चित्रित केला गेला आहे तो चुकीचा आहे. आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून असे सिद्ध होते की, संध्याकाळी रवीना टंडनच्या घराबाहेर महिलांचा एक गट आला आणि त्यांनीच आरडाओरडा करण्यास सुरुवात केली आणि ड्रायव्हरशी मारामारी केली. ती फक्त तिच्या ड्रायव्हरला वाचवण्यासाठी त्यांच्यात सामील झाली.”

आणखी वाचा – “राम फक्त अयोध्येत…”, ‘रंग माझा वेगळा’ फेम सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचे भाष्य, म्हणाला, “इतके वर्षे…”

तर आणखी एका स्त्रोताच्या वृत्तानुसार, “जर ड्रायव्हरने त्यांना आधी जखमी केले असेल तर त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन एफआयआर का दाखल केला नाही? बातम्यांमध्ये जे काही चालले आहे त्या विपरीत, रवीना नशेत नव्हती. ड्रायव्हरने या महिलांवर हल्ला केल्याची बातमीही खोटी आणि बनावट आहे.

आणखी वाचा – लक्ष्मीकांत बेर्डे व अशोक सराफ यांनी प्रशांत दामलेंना दिलेला ‘तो’ सल्ला फायदेशीर ठरला, स्वत: दामलेंनीच सांगितले कारण, म्हणाले…

दरम्यान, रवीनाचा ड्रायव्हर तिच्या घराजवळ रिव्हर्समध्ये कार पार्क करण्याचा प्रयत्न करत होता, त्यावेळी त्यांच्या गेटजवळून एक कुटुंब जात होते. त्यांना वाटले की त्यांची कार त्यांना धडकेल, यावरून वाद झाला. रवीनाही या वादात सामील झाली. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. हे प्रकरण सध्या तिच्या वकिलाकडे असल्याने रवीनाने कोणतेही वक्तव्य करणे टाळले आहे.

Tags: bollywood actressraveena tandonRaveena Tandon Viral Video
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Akshay Kelkar Wedding
Entertainment

शुभमंगल सावधान! ‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नबंधनात, लग्नातील पहिला फोटो समोर

मे 9, 2025 | 6:08 pm
Aly Goni Viral Post
Entertainment

“जम्मूमध्ये माझं कुटुंब हल्ले सहन करतायत”, भारत-पाकमधील वाढत्या तणावामुळे प्रसिद्ध अभिनेता काळजीत, सांगितली सत्य परिस्थिती…

मे 9, 2025 | 5:35 pm
Pakistani Person Viral Video
Social

“त्यांना न्याय मिळाला”, पाकिस्तानी नागरिकाकडून भारतीय सैन्याचे कौतुक, पाक सैन्याला खडेबोल सुनावत…

मे 9, 2025 | 4:08 pm
Neha Kakkar Attends Driver Wedding 
Entertainment

नेहा कक्करची ड्रायव्हरच्या लग्नात उपस्थिती, नवरी मुलगी नमस्कार करण्यास खाली वाकताच घेतलं जवळ, गायिकेच्या कृतीने जिंकलं मन

मे 9, 2025 | 1:03 pm
Next Post
03 June 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

कर्क, सिंह व धनु राशीच्या लोकांसाठी सोमवारचा दिवस चांगला, सर्व इच्छा होतील पूर्ण, तुमच्यासाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.