मंगळवार, जून 3, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रियांका चोप्राची आई मधु चोप्रा यांना त्या निर्णयाचा पश्चाताप, स्वतः खुलासा करत म्हणाल्या, “मी खूप स्वार्थी…”

Shamal Sawantby Shamal Sawant
नोव्हेंबर 30, 2024 | 12:57 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
priyanka chopra mother statement

प्रियांका चोप्राच्या आईला 'या' निर्णयाचा पश्चाताप

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या खूप चर्चेत आहे. आजवर ती अनेक हिंदी तसेच हॉलिवूड चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसते. तिच्या अनेक भूमिकांना चाहत्यांची पसंतीदेखील मिळते. सध्या प्रियांका लॉस एंजलिसमध्ये कुटुंबाबरोबर स्थायिक झालेली बघायला मिळते. मुलगी व नवऱ्याबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओदेखील ती शेअर करताना दिसते. प्रियांकाने मॉडेलिंग करुन करियरची सुरुवात केली होती. २००० साली तिने मिस वर्ल्डचा किताबदेखील जिंकला आहे. खूप मेहनत करुन तिने मनोरंजन क्षेत्रात स्वतःची अशी एक वेगळी जागा निर्माण केली आहे. तिच्या प्रत्येक संघर्षाच्यावेळी तिची आई मधु चोप्रा यांनी तिची खूप साथ दिली. त्यांनी प्रियांकाबद्दल एका गोष्टीचा पश्चाताप होत असल्याचे सांगितले आहे. (priyanka chopra mother statement)

मधु चोप्रा यांनी रॉड्रिगो कॅनल्सच्या पॉडकास्टमध्ये उपस्थिती दर्शवली होती. यावेळू त्यांनी प्रियांकाला बोर्डिंग स्कूलला पाठवण्याबद्दल भाष्य केले. त्या म्हणाल्या की, “माहीत नाही पण मी एक स्वार्थी आई होते. मला आजही त्या गोष्टीचा पश्चाताप होत आहे. मी आजही ती गोष्ट आठवून रडते. माझ्यासाठीही खूप कठीण होते. पण मी प्रत्येक शनिवारी काम सोडून ट्रेन पकडायचे आणि प्रियांकाला भेटायला जायचे”.

आणखी वाचा – गांवकरांच्या घरी रमली नवी सूनबाई, सुरु आहे अभिषेक गांवकरचा सुखी संसार, लग्नानंतरचे खेळ खेळण्यात दोघेही दंग अन्…

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

पुढे त्या म्हणाल्या की, “तिच्यासाठीदेखील सगळं खूप कठीण होतं. ती बोर्डिंगमध्ये व्यवस्थित राहू शकत नव्हती. शनिवारी ती माझ्या येण्याची वाट बघायची आणि रविवारी आम्ही संपूर्ण दिवस एकत्रित राहायचो. संपूर्ण आठवडा तिच्या शिक्षिका मला भेटायला येण्यास रोखायच्या”.

आणखी वाचा – ‘पुष्पा २’ फेम अल्लू अर्जुनचा मोठा खुलासा, हिंदी चित्रपटांमध्ये काम न करण्यामागचं सांगितलं कारण, म्हणाला, “खूप कठीण…”

मधु यांना प्रियांकाला बोर्डिंगला पाठवल्याचा आजही पश्चाताप होत असल्याचे सांगितले आहे. पण प्रियांकाने सगळे निर्णय योग्य घेतले आणि स्वतःच्या पायांवर उभी राहिली. मधू यांनी प्रियांकाच्या प्रत्येक निर्णयात साथ दिली. प्रियांकाबरोबर त्या नेहमी चित्रीकरणासाठीही जात असत. अभिनेत्रीने २००२ साली तमिळ चित्रपट ‘तमीजान’चित्रपटातून अभिनयास सुरुवात केली. सध्या ती निर्माती म्हणूनही नावारूपास आली आहे. तिने हिंदी तसेच मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे.   

Tags: madhu chopramotherpriyanka chopra
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Zepto News
Social

अन्न तुंबलेल्या पाण्याजवळ ठेवले आणि…; झेप्टोचा किळसवाणा प्रकार समोर, तुम्हीही ऑर्डर करत असाल तर…

जून 3, 2025 | 4:23 pm
Actor Vibhu Raghav death
Entertainment

Video : कॅन्सरमुळे सुप्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, लेकाला शेवटचं पाहताना ढसाढसा रडली आई, भावुक व्हिडीओ समोर

जून 3, 2025 | 3:50 pm
Ali aslgar says no to female roles
Entertainment

अचानक कुठे गायब झाला अली असगर?, स्त्री पात्रांना तोंडावर नकार, मुलांना टोमणे मारायचे म्हणून…; आता अभिनेता काय करतो?

जून 3, 2025 | 3:17 pm
usha Nadkarni ankita lokhande
Entertainment

“मला काय झालं तर कोण बघणार?”, ७९व्या वर्षीही एकट्याच राहतात उषा नाडकर्णी, परिस्थिती सांगताना रडू कोसळलं अन्…

जून 3, 2025 | 1:34 pm
Next Post
Aishwarya Narkar Video

"एवढं करण्यापेक्षा पार्लरमध्ये जा", घरीच ऐश्वर्या नारकरांनी केले स्वतःचे Eyebrow, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, "या ट्रिकमध्ये…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.