जागतिक स्तरावर सध्या अंदाधुंदीचं वातावरण पसरलेलं आहे. ‘गाझा’ पट्टीतील सत्ताधारी ‘हमास’ या दहशतवादी गटाने शनिवारी इस्त्रायलवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात जवळ जवळ १०० जण मृत्युमुखी पडले. याला प्रत्युत्तर म्हणून इस्त्रायलने ‘गाझा’ पट्टीवर अनेक हवाई हमले केले. यात १९८ नागरिक ठार झाल्याचा दावा केला जात आहे. या हल्ल्यानंतर दोघांमधील संघर्षाने वेगळं वळण घेतलं आहे. युद्धात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. तर इस्त्रायलचे पंतप्रधान बिन्यामीन नेतान्याहू यांनी तर थेट युद्धाची घोषणा केली आहे. यासगळ्यात बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत भारुचा तिथे अडकली असल्याची बातमी समोर आली होती. तिच्याशी संपर्क होत नसल्याचं तिच्या टीमकडून सांगण्यात येत होतं. पण नवीन माहितीनुसार नुसरत सुरक्षित असल्याच समोर आलं आहे. (nushrratt bharuccha is safely return in india)
त्यात आता अभिनेत्री मुंबईमध्ये पोहोचली आहे. सोशल मीडियावरून एक व्हिडिओ समोर येत आहे ज्यात नुसरत विमानतळावरून बाहेर येताना दिसत आहे. या व्हिडिओत ती खूप धकलेली दिसत आहे. यावेळी ती म्हणाली, “आता मी खूप त्रासलेली आहे. मला घरी जाऊ द्या”. ‘हैफा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये सहभागी होण्यासाठी अभिनेत्री गेली होती. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिचा ‘अकेली’ चित्रपट दाखवण्यात आला. त्यानंतर तिच्याबरोबर दुपारी साडेबारा वाजता शेवटचा संपर्क झाला होता. तिथे वातावरण बिघडलं आणि त्यात ती अडकली होती.
#WATCH | Actress Nushrratt Bharuccha arrives at Mumbai airport from Israel https://t.co/kLfmKomeN3 pic.twitter.com/FqyhOtj9FZ
— ANI (@ANI) October 8, 2023
नुसरतच्या टीममधील संचिता त्रिवेदीने ही माहिती दिली होती. तिने याबाबत सांगताना म्हणाली, “आम्ही नुसरतशी संपर्क साधण्यात यशस्वी झालो आहोत. दूतावासाच्या मदतीने तिला सुखरुप घरी आणले जात आहे. आम्हाला थेट फ्लाइट सापडली नाही. पण ती कनेक्टिंग फ्लाइटने घरी येत आहे. तिच्या पुढिल सुरक्षेसाठी, अधिक तपशील शेअर करता येणार नाही. पण ती भारतात पोहोचताय आम्ही तुम्हाला कळवू. ती सुरक्षित आहे आणि ती भारतात येत आहे त्याबद्दल आम्ही देवाचे खूप आभारी आहोत”, अशी माहिती दिली होती.
इस्त्राइल व पॅलेस्टिनी दहशतवादी गटात झालेल्या युद्धात अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. तिथली स्थनिक परिस्थिती खूप बिकट आहे. त्यामुळे नुसरत तिथे अडकली आहे हे कळताच तिचे कुटुंबिय व नातेवाईक बरेच चिंतेत होते. पण आता तिच्याबरोबर संपर्क झाल्यामुळे आणि ती भारतात परतल्यानंतर सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.