७०-८० च्या दशकातील अभिनेत्री मुमताज व गायिका आशा भोसले यांची अनेक वर्षांपासूनची मैत्री आहे. त्यांची ही मैत्री आजही अस्तित्वात आहे. अशातच या मैत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्री मुमताजने आजवर तिच्या नृत्य कौशल्याने रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला आहे. तर आशा भोसले या दिग्गज गायिका म्हणून प्रसिद्ध आहेत. अशातच या दोन्ही सुपरस्टार एकाच छताखाली एकत्र येत धमाल मस्ती करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Mumtaz And Asha Bhosale Dance Video)
मुमताजने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या ‘लोफर’ चित्रपटातील ‘कोई शहरी बाबू’ या गाण्यावर नाचताना दिसत आहे. यादरम्यान ती आशा ताईंना डान्स करायला लावताना दिसत आहे. मुमताजच्या आग्रहाखातर आशाजींनी ही ठेका धरलेला पाहायला मिळत आहे. या गाण्यावर मुमताजने डान्स केला तेव्हा आशाजींनी या गाण्याला आपला आवाज दिला होता, प्रसिद्ध जोडी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी हे गाणं संगीतबद्ध केले होते.
‘लोफर’ या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आता जवळपास ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. १९७३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लोफर’ चित्रपटातील हे गाणे मुमताज यांच्यावर चित्रित करण्यात आले होते आणि ते आशा भोसले यांनी गायले होते. आजही मुमताज यांना त्याच अंदाजात नाचताना बघून अनेकांना त्यांच्या चित्रपटाची आठवण झाली. मुमताज व आशा भोसले यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत.
७० चं दशक गाजवलेल्या अभिनेत्रींच्या यादीत मुमताज यांचं नाव अग्रस्थानी आहे. वयाच्या पंच्याहत्तरीमध्येही मुमताज यांचं सौंदर्य अगदी आहे तसेच आहे. आजही मुमताज वर्कआऊटला अधिक प्राधान्य देतात.