बॉलिवूड सेलिब्रिटी आणि स्टारकिड्स हा सोशल मीडियावरील नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. बॉलिवूडची अनेक् कलाकार मंडळी एअरपोर्टवरुन मायदेशात परतल्यावर पापाराजी या कलाकारांचे अनेक् फोटो व व्हिडीओ काढत असतात आणि हे व्हिडीओ सोशल मीडियावरदेखील चांगलेच व्हायरल होतात. अशातच करीना कपूर व सैफ अली खान यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Kareena Kapoor With Her Sons)
सैफ अली खान व करीना कपूर हे त्यांची मुले तैमूर व जेह यांच्याबरोबर नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी स्वित्झर्लंडमध्ये गेले होते. गुरुवारी हे कुटुंब मुंबईत परतले. तेव्हा एअरपोर्टवर पापाराझींनी खान कुटुंबाला स्पॉट केलं.अशातच एअरपोर्टवरील जेहचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो रडताना दिसत आहे.
आणखी वाचा – “आमचे एकत्र फोटो…”, सिद्धार्थ बोडकेबरोबरच्या नात्यावर तितिक्षा तावडेचा खुलासा, म्हणाली, “गेली अनेक वर्ष…”
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये जेह त्याची आई करिनाचा हात पकडून हसत खेळत चालताना दिसत आहे. त्यानंतर जेह, तैमूर सैफ हे त्यांच्या गाडीजवळ येतात. तैमूर गाडीच्या पुढच्या सीटवर बसतो. त्यानंतर जेह त्याच्या जवळ बसायला जातो, मात्र सैफ त्याला मागच्या सीटवर बसायला सांगतो. तेव्हा करीना त्याला पुढच्या सीटवरुन उतरवते अआणि मागे बसायला घेऊन जाते. त्यामुळे गाडीमधून उतरल्यावर जेह रडायला लागतो.
दरम्यान, या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी अनेक गंमतीशीर कमेंट्स केल्या आहेत. एकाने कमेंट करत असे म्हटले आहे की, “त्याला फ्रंट सीटवर बसायचं आहे. सगळी लहान मुलं सारखीच असतात” तर दुसऱ्याने कमेंट करत असे म्हटले आहे की, “घरातल्या दुसऱ्या मुलाबरोबर नेहमीच हे असं होतं” याचबरोबर “या सेलिब्रिटींची मुलंही अशीच भांडतात का?, करिनाने कॅमेऱ्यासमोर मुलांशी केलेली ही वागणूक मला आवडली” अशा अनेक् कमेंट्स करत नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.