अभिनेत्री कंगना रणौत सध्या अभिनयामुळे नाही तर राजकारणामुळे खूप चर्चेत आली आहे. मंगळवारी लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर कंगना हिमाचल प्रदेशमधील मंडी विभागातून निवडून आली. त्यानंतर गुरुवारी लगेचच तिच्याबरोबर अशी घटना घडली ज्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला. निवडणुका जिंकल्यानंतर पाहिल्यांदाच दिल्ली येथे जात होती. यावेळी चंदीगढ एअरपोर्टवर महिला कॉन्स्टेबलने कंगनाच्या कानशिलात लगावली होती. या प्रकरणावर आता सर्वत्र चर्चा होत आहे. सोशल मीडियावरही अनेकांनी या घटनेचा निषेध केला आहे. तिच्या चाहत्यांनी संबंधित माहिलेवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील केली होती. (kangana ranaut on bollywood)
कंगनाबरोबर सदर प्रकार घडल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. कंगनानेदेखील आपबिती सांगितली. मात्र इतके होऊनही बॉलिवूडमध्ये शांतता असेलेली दिसून आली. यामुळे कंगनाला खूप वाईट वाटले. तिने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून बॉलिवूडकरांवर निशाणा साधला आहे. पण काही वेळानंतर तिने शेअर केलेली पोस्ट डिलिटही केली.

या पोस्टमध्ये कंगनाने लिहिले की, “प्रिय, चित्रपटसृष्टी माझ्यावर जो हल्ला झाला त्यावर सर्वांनी उत्साह साजरा केला. तसेच शांततादेखील बाळगली. पण हे लक्षात ठेवा की उद्या तुम्ही देशातील रस्त्यावर फिरत असाल तेव्हा जर इस्रायली किंवा फिलिस्तानी लोकांनी तुमच्या मुलांवर हल्ले केले तर काय होईल? तुम्ही केवळ राफासाठी उभे राहिलात, इस्रायल प्रकरणाचं तुम्ही समर्थन केलं. यामुळे जर तुमच्या मुलांच्या जीवाला धोका निर्माण झालं तर बघा मी तुमच्या स्वातंत्र्यासाठी लढेन. जेव्हा तुम्हाला वाटेल की मी का आहे? कुठे आहे? तर लक्षात ठेवा तुम्ही म्हणजे मी नाही”.

तसेच दुसऱ्या पोस्टमध्ये तिने लिहिले की, ‘ऑल आईज ऑन राफा’ गॅंग ही तुमच्याबरोबर किंवा तुमच्या मुलांबरोबरही होऊ शकतं. जेव्हा तुम्ही एखाद्यावरील हल्ल्याचे समर्थन करता तेव्हा लक्षात ठेवा की हे एक दिवस तुमच्याबरोबरही होऊ शकतं”.
कंगना निवडून आल्यापासून काही ना काही विवादांमध्ये अडकत चालली आहे. संसद भवनात बैठकीसाठी उपस्थित राहत असतानादेखील तिने पत्राकरांबरोबर हुज्जत घातली. हा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.