बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या खूप चर्चेत आहे. सध्या अभिनय सोडून तिने राजकारणात प्रवेश केला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशमधील मंडी या भागातून खासदार म्हणून निवडून आली. त्यानंतर चंदीगढ एअरपोर्टवर तिला कॉन्स्टेबलने कानाखाली मारल्यानेही ती खूप चर्चेत आली. सदर प्रकरणानंतर तिला तिला काहीजणानी पाठिंबा दिला तर काहींनी तिला ट्रोलही केले. मात्र आता ती या सगळ्यापासून ब्रेक घेत कुटुंबाबरोबर वेळ घालवताना दिसत आहे. तिचे काही फोटोदेखील समोर आले आहेत. (kangana ranaut new home)
सध्या कंगना तिच्या घरी आहे. तिचा चुलत भाऊ वरुण रणौत नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. नवविवाहित जोडप्याला कंगनाने लग्नाची खास भेट दिली आहे. त्याचे फोटोही समोर आले आहेत. कंगनाने स्वतः इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. तिने भाऊ वरुण व त्याची पत्नी अंजली यांना एक घर गिफ्ट केले आहे. यासाठी फोटो पोस्ट करत वरुणने लिहिले आहे की, “ही सुंदर भेट दिल्याबद्दल खूप धन्यवाद दीदी. चंदीगढमध्ये आता घर आहे”.

तसेच कंगनानेदेखील गृहप्रवेशाचे फोटो शेअर केले आहेत. तसेच बहीण रंगोलीच्या सोशल मीडियावरुनदेखील फोटो शेअर केले आहेत. यामध्ये कंगनाने लिहिले आहे की, “गुरुनानकजींनी सांगितले होते की तुमच्याकडे जे काही आहे ते आपण एकमेकांना दिले पाहिजे. त्यांनी सांगितले होते आपल्याला नेहमी वाटते की आपल्याकडे जेवढे आहे तितके पुरेसे नाही. तरीही आपण ते दिले पाहिजे. मला वाटते की यापेक्षा जास्त सुख असं काही नाही. मला सर्व मिळाल्याबद्दल खूप धन्यवाद”.

वरुणने आपल्या सोशल मीडियावरुन अंजलीबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये कंगनादेखील दिसून येत आहे. कंगनाने पांढऱ्या व सोनेरी रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला आहे. यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.