बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही नेहमी चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिच्या बॉयफ्रेंडबद्दलच्या चर्चामुळे अधिक प्रकाश झोतात आली होती. तसेच आयपीएल दरम्यानेदेखील ‘माही’ असे लिहिलेले कपडे घातलेलीदेखील दिसून आली. त्यावेळी ती महेंद्रसिंह धोनीला चीयर करण्यासाठी पोहोचली आहे असे म्हंटले जात होते. मात्र असे नसून ती तिच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करत होती. अभिनेता राजकुमार रावबरोबर तिचा नवीन चित्रपट ‘मि अँड मिसेस माही’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नवीन रूपात जान्हवीला पाहायला मिळणार आहे. (janahvi kapoor on dr. ambedkar and mahatma gandhi )
‘मि अँड मिसेस माही’ या चित्रपटाच्या निमित्ताने ती सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी ती ‘द लल्लनटॉप’ला मुलाखत दिली. मुलाखतीदरम्याने अनेकदा जान्हवी आपल्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करताना दिसते. मात्र या मुलाखतीदरम्याने जान्हवीने केलेल्या वक्तव्यावर सर्वच स्तरातून चर्चा सुरु आहे. या मुलाखतीमध्ये तिने दलित समाज, महात्मा गांधी व डॉ. भीमराव आंबेडकर यांच्यावर भाष्य केले आहे. अनेक मुद्यांवर चर्चा केली आहे.
जान्हवीने अशा विषयांवर केलेल्या वक्तव्यामुळे खूप चर्चा झाली आहे. या मुलाखतीदरम्याने तिला विचारले की, “तुझ्याकडे जर टाइम मशीन असेल तर कोणत्या काळात जायला आवडेल?”,” त्यावर ती म्हणाली की, “मी उत्तर देईन पण नंतर यासंदर्भात कोणताही प्रश्न विचारु नका. कारण यानंतर मी जे बोलले ते नंतर कसे लोकांपर्यंत पोहोचेल. पण आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामधील प्रतिसंवाद पाहायला आवडेल”.
त्यानंतर तिला विचारले की, “दोघांच्याही दलित समाजाच्या विचारांबद्दल तू काय सांगशील?”, त्यावर तिने उत्तर दिले की, “डॉ. आंबेडकर व गांधी यांचे विचार खूप वेगळे होते. आंबेडकरांचे विचार आधीपासूनच स्पष्ट व मजबूत होते. पण गांधी यांचे विचार विकसित होत होते. जातीवादाच्या समस्येबद्दल एक तिसरी व्यक्ती म्हणून विचार करणे तसेच त्याबद्दल माहिती घेणे आणि ते जीवन जगणे यामध्ये खूप अंतर आहे”.
तिला पुढे विचारण्यात आले की, “शाळेमध्ये अशा प्रकारच्या चर्चा कधी व्हायच्या का?”, त्यावर तिने उत्तर दिले की, “नाही शाळेत कधी नाही. तसेच घरामध्येही जातीवादावर कधीही चर्चा झाली नाही”. दरम्याने जान्हवीने सामाजिक विषयांवर चर्चा केल्याने चाहत्यांनी तिचे खूप कौतुक केले आहे. नेटकऱ्यांनी तिला ‘ब्युटी विथ ब्रेन’ असेही म्हंटले आहे.