बॉलीवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ लवकरच आई होणार असून जेव्हा गरोदर असल्याची घोषणा केली, त्यावेळेस तिने आपल्या बाळाच्या बाबांचा चेहरा जगासमोर आणला नव्हता. आता मात्र या मिस्ट्री मॅनची ओळख तिने आणली असून एक इंस्टाग्राम पोस्ट करत तिच्या बॉयफ्रेंडला अखेर जगासमोर आणले. (ileana d’cruz boyfriend face reveals)
इलियाना सध्या परदेशात असून ती तिचं गरोदरपण चांगलंच एन्जॉय करताना दिसत आहे. इंस्टाग्रामवर ती आपल्या मातृत्वाचा प्रवासाबद्दल अनेकदा बोलत असून चाहत्यांना सतत याचे अपडेट देताना दिसतेय. नुकतंच तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर काही फोटोज शेअर केले असून ज्यात ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत डेट नाईटसाठी गेलेत. दोघेही आनंदी दिसत असून दोघेही एकमेकांकडे रोमँटिक पद्धतीने पाहतायत. या फोटोजना इलियानाने “date night ❤” असं कॅप्शन दिलेलंय. यासोबतच तिने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिलेला आहे. (ileana d’cruz pregnancy)
हा आहे इलियानाचा बॉयफ्रेंड (ileana d’cruz boyfriend face reveals)

अभिनेत्री इलियाना डिक्रूझने जेव्हा आपल्या गरोदरपणाची घोषणा केली होती, तेव्हा याची जोरदार चर्चा झाली होती. कारण इलियानाचं अदयाप लग्न झालेलं नसून तिच्या बॉयफ्रेंडची ओळखही गुप्ता ठेवल्याने चाहत्यांनी तिच्या अफेअरचे अनेक अंदाज बांधले होते. विशेष म्हणजे, इलियाना अभिनेत्री कतरिना कैफचा भाऊ सेबास्टिन लॉरेंट मिशेलला डेट करत असल्याची चर्चा असून तिचे व कतरिनाच्या कुटुंबासोबतचे फोटोस सोशल मीडियावर व्हरायल झाल्यानंतर डेटिंगच्या अफवा झाल्या होत्या.
पण गरोदरपणाच्या घोषणेनंतर काही दिवसांनी तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो पोस्ट केला होता, ज्यात तिच्या बॉयफ्रेंडचा चेहरा अस्पष्ट दिसत होता; तेव्हा या चर्चेला पुन्हा उधाण आले होते. अखेर तिने आज पोस्ट शेअर करत या सर्व अफवा व चर्चांना पूर्णविराम दिला. (ileana d’cruz boyfriend)
हे देखील वाचा : सलग फ्लॉप चित्रपट केल्यामुळे ‘OMG २’ मध्ये अक्षय कुमारने केली मानधनात घट