रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, जोरात मारलं आणि…; बॉलिवूड अभिनेत्रीकडून भयानक घटनेचा खुलासा, म्हणाली, “माझा पाठलाग करत…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 12, 2025 | 11:15 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Fatima Sana Shaikh harassment

चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, जोरात मारलं आणि…; बॉलिवूड अभिनेत्रीकडून भयानक घटनेचा खुलासा, म्हणाली, "माझा पाठलाग करत…"

Fatima Sana Shaikh harassment : मराठी-हिंदी सिनेविश्वातील अनेक अभिनेत्रींनी आजवर त्यांच्याबरोबर घडलेल्या वाईट प्रसंगाबाबत स्पष्टपणे भाष्य केलं आहे. केवळ अभिनेत्रीच नाहीतर सर्वसामान्य स्त्रियांनाही वाईट स्पर्श, वाईट वागणूक याचा अनुभव आला आहे. पण अभिनेत्रींकडे बरेचदा प्लॅटफॉम उपलब्ध असल्याने त्या या गोष्टी सहजपणे सांगतात. काही अभिनेत्री असं काही सांगायला घाबरतात तर काही स्पष्टपणे मुद्दा मांडून इतरांना सावध करतात. अशातच आता एका बॉलिवूड अभिनेत्रीने तिच्याबरोबर घडलेल्या वाईट प्रसंगाबाबत खुलासा केला आहे. अभिनेत्री फातिमा सना शेख हिने तिच्याबरोबर घडलेल्या एका अतिशय भयानक घटनेचा खुलासा केला. सार्वजनिक ठिकाणी अयोग्यरित्या स्पर्श केल्याने तिचा संताप झाला.

‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत फातिमाने तिच्याबरोबर घडलेल्या वाईट प्रसंगाचा उल्लेख केला. एका व्यक्तीने तिला सार्वजनिक ठिकाणी अयोग्यरित्या स्पर्श केला, त्यानंतर अभिनेत्रीने त्याला मारहाण केली, पण त्या व्यक्तीनेही फातिमाला खूप मारहाण केली. नेमकं काय घडलं याबाबत तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. फातिमा म्हणाली, “एकदा एका माणसाने मला अयोग्यरित्या स्पर्श केला, म्हणून मी त्याला मारलं. पण नंतर त्याने मला इतकं जोरात मारलं की मी जमिनीवर पडले”.

आणखी वाचा – “प्रेग्नेंट होस्ट नको कारण…”, इंडियन आयडॉल रिऍलिटी शोबाबत अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “भारतीय प्रेक्षक…”

फातिमा पुढे म्हणाली, “मी त्याला फक्त अयोग्यरित्या स्पर्श केल्यामुळे मारलं, पण तो इतका रागावला की, त्याने मला इतकं जोरात मारलं की, मी थेट खाली पडले. त्या घटनेनंतर मी थोडी सावध झाले. मला समजलं की, अशा परिस्थितीत कशी प्रतिक्रिया द्यायची याचा विचार आपणही केला पाहिजे. तुम्हाला वाटतं, आपल्याबरोबर काहीतरी चूक होत आहे आणि आपण त्यावर कशी प्रतिक्रिया द्यायची याचा विचार केला पाहिजे”.

आणखी वाचा – ब्लाऊजमध्ये हात घातला, ऑफिसमध्ये नेलं आणि…; पुजाऱ्याचे अभिनेत्रीबरोबर घाणेरडं कृत्य, पोस्ट शेअर करत सांगितला किळसवाणा प्रसंग

आणखी एक किस्सा सांगत ती म्हणाली, “लॉकडाऊनच्या काळातही ‘लॉकडाऊन दरम्यान मी मुंबईत मास्क घालून सायकल चालवत होते. तेव्हा एक टेम्पो ड्रायव्हर सतत हॉर्न वाजवत होता आणि विचित्र आवाज काढत होता. मी माझ्या रस्त्यावर येईपर्यंत तो माझा पाठलाग करत होता”. फातिमा सना शेख अलीकडेच अनुराग बसू दिग्दर्शित ‘मेट्रो इन दिनो’ चित्रपटात दिसली होती. अली फजल, पंकज त्रिपाठी, कोंकणा सेन शर्मा, नीना गुप्ता, अनुपम खेर आणि आदित्य रॉय कपूर सारखे कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.

Tags: bollywood actressentertainmentFatima Sana
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Kalki Koechlin Breakup Stratergy

बॉयफ्रेंडबरोबर ब्रेकअपसाठी भलत्याच पुरुषाशी शरीरसंबंध अन्…; अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा, म्हणाली, "अनेकांना डेट…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.