बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पडूकोण सध्या खूप चर्चेत आहे. आजवर तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. मात्र सध्या ती तिच्या अभिनयामुळे नाही गरोदरपणामुळे चर्चेत आली आहे. फेब्रुवारी महिन्यात रणवीर व दीपिका यांनी आई-वडील होणार असल्याचे जाहीर केले होते. सप्टेंबर महिन्यात ती बाळाला जन्म देणार असे देखील सांगण्यात आले होते. गरोदरपणाच्या घोषणेनंतर ती अनेक ठिकाणी दिसून आली होती. तिचे बेबी बम्प पाहून ती स्वतः गरोदर असण्यावर अनेकांनी प्रश्न देखील उपस्थित केले होते. (deepika padukone new photoshoot)
दीपिकाचा बहूचर्चित चित्रपट ‘कल्की २८९८ एडी’ भेटीला आला होता. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्याने तिने घातलेला ड्रेस तसेच उंच हिल्समुळे ती गरोदर नसल्याचे सोशल मीडियाच्या माध्यामातून अनेक चर्चा झाल्या. मात्र यावर दीपिका व रणवीरने कोणतेही भाष्य केले नाही. दीपिकाचे अनेक फोटों व व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आशातच आता तिने नवीन फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हे फोटो पोस्ट करुन अभिनेत्रीने सगळ्यांचीच बोलती बंद केली.
दीपिकाने रणवीरबरोबर काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये तिने बेबी बम्प फ्लॉट केले आहे. तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. काळ्या रंगाचा शर्ट, तसेच नेटचा आकर्षक ड्रेस परिधान केला आहे. यामध्ये तिची आकर्षक फिगरदेखील दिसून येत आहे. तसेच तिचा प्रेग्नन्सी ग्लोदेखील दिसून येत आहे. दरम्यान या फोटोंना चाहत्यांनी खूप पसंती दर्शवली आहे. तसेच प्रतिक्रियादेखील दिल्या आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच दीपिका बाळाला जन्म कधी देणार याबद्दल माहिती समोर आली होती. सप्टेंबर महिन्यातील २८ तारखेला ती बाळाला जन्म देऊ शकते असे बोलले जात आहे. मात्र याबद्दल अधिकृत माहिती अजून समोर आली नाही. अशातच आता फोटो समोर आल्यापासून तिच्या बाळाची आगमनाची ओढ लागली आहे.