बॉलिवूडमधील आमीर खान सध्या खूप चर्चेत आहेत. काही वर्षापूर्वी त्याच्या ‘दंगल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली होती. या चित्रपटाने सगळेच रेकॉर्ड मोडले होते. भारतीय कुस्तीपटू गीता फोगाट व बबिता फोगाट यांच्या जिवानावर आधारित हा चित्रपट तयार केला होता. हा चित्रपट चांगलाच चर्चेत आला होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. ‘दंगल २’हा चित्रपट कुस्तीपटू विनेश फोगाटच्या आयुष्यावर आधारित असणार आहेत. (dangal 2 movie )
आमीर एक परफेक्ट अभिनेता आहे. वर्षातून एकच मात्र सुपरहीट चित्रपटांची निर्मिती तो करत असतो. अशातच आता त्याच्या नवीन चित्रपटाबद्दल एक नवीन अपडेट समोर येत आहे. सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. यामध्ये आमीर विनेशबरोबर व्हिडीओ कॉलवर बोलताना दिसत आहे. यावरुन आता ‘दंगल २’मध्ये ती दिसेल आणि आतापर्यंतचे सगळेच रेकॉर्ड मोडेल अशी आशादेखील व्यक्त केली जात आहे.
‘बॉलिवूड नाऊ’नुसार, भारताची चॅम्पियन कुस्तीपटू विनेश पॅरिस ऑलिंपिक २०२४ मधून माघारी आली. तेव्हा आमीरने तिला फोन केला. अमीर व विनेश यांच्यामध्ये खूप वेळ बोलणं झालं. यांमध्ये तिला शुभेच्छा दिल्या आणि पुढे चांगला खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहनदेखील दिले. याबद्दल आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. आमीरने विनेशबरोबर चर्चा केली आहे म्हणजे काहीतरी त्याने विचार केलाच असेल असे सगळ्यांचे म्हणणे आहे. त्याच्या मनात कदाचित ‘दंगल २’चा देखील विचार असू शकतो. तिची गोष्ट खूप प्रेरणादायी आहे.
‘दंगल’ हा चित्रपट २३ डिसेंबर २०१६ साली संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट नितेश तिवारीने दिग्दर्शित केला होता. यामध्ये आमीर खान, जायरा वसिम, साक्षी तलवार, सान्या मल्होत्रा, सुहानी भटनागर, अपारशक्ति खुराना व फातीमा शेख हे महत्त्वाच्या भूमिकेमध्ये होते.