बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : मुलीला जन्म दिल्यानंतर दीपिका पदुकोणला रुग्णालयातून डिस्चार्ज, पती रणवीर व चिमुकलीसह घरी परतली अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 15, 2024 | 2:49 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Deepika Padukone discharged from hospital

मुलीला जन्म दिल्यानंतर दीपिका पदुकोणला रुग्णालयातून डिस्चार्ज, लेक व पतीसह अभिनेत्री घरी रवाना

Deepika Padukone Discharged : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण व अभिनेता रणवीर सिंहच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे. दीपिका व रणवीर अखेर आई-वडील झाले आहेत. दीपिकाने ८ सप्टेंबर रोजी मुलीला जन्म दिला आणि आता डिलिव्हरीच्या नऊ दिवसांनंतर अभिनेत्री दीपिका पदुकोणला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अभिनेत्री आपल्या चिमुकली परी आणि कुटुंबासह घराकडे रवाना झाली आहे, ज्याचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. दीपिका पदुकोणला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून ती मुलगी आणि नवरा रणवीरबरोबर घरी जाण्यासाठी रवाना झाली आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण आज म्हणजे रविवारी आपल्या लाडक्या मुलीसह रुग्णालयातून घराकडे रवाना झाली आहे. (Deepika Padukone Discharged From Hospital)

दीपिका व रणवीर त्यांच्या बाळासह घराकडे रवाना झाले आहेत आणि यावेळी रणवीरबरोबर दीपिकाची सासू-सासरेही त्यांच्या छोट्या परीला घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. मात्र, हॉस्पिटलमधून बाहेर पडतानाच्या ना रणवीर व दीपिका दिसत होते ना घरातील इतर कुणी. त्यांची फक्त गाडी हॉस्पिटलबाहेर पडताना दिसली. पापाराझींनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही फोटोमध्ये दीपिका पदुकोणचा बॉडीगार्ड कारमध्ये बसल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओला दीपिका व रणवीरच्या अनेक चाहत्यांकडून लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

View this post on Instagram

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरात पॅडीला भावुक झालेला पाहून सहअभिनेत्रीने सांगितला जुना किस्सा, म्हणाली, “आम्ही प्रयोगाला जात होतो तेव्हा…”

अभिनेत्री दीपिका पदुकोणने ८ सप्टेंबरला गोंडस मुलीला जन्म दिला. लग्नाच्या सहा वर्षांनंतर दीपिका-रणवीर आई-बाबा झाले आहेत. या जोडप्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. गणेशोत्सवात दीपिका आणि रणवीरच्या आयुष्यात लक्ष्मीचं आगमन झाल्याचं बोलत त्यांच्या अनेक चाहत्यांनी चिमुकलीसह दीप-वीरवर शुभेच्छांचा वर्षाव केला. अशातच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटो व व्हिडीओलाही नेटकऱ्यांकडून तूफान प्रतिसाद मिळत आहे.

आणखी वाचा – Video : ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधतीने मुंबईत घेतलं स्वत:चं नवीन घर, व्हिडीओद्वारे दाखवली खास झलक, म्हणाली, “अनेक वर्ष जपलेलं स्वप्न…”

दरम्यान, दीपिका पदुकोण व रणवीर सिंह यांनी २०१८ मध्ये लग्न केलं. लग्नाच्या ६ वर्षानंतर हे जोडपे एका मुलीचे पालक झाले आहेत. मुलीच्या जन्मानंतर घरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दीपिका व रणवीर यांनी प्रसूतीपूर्वी फोटोशूटही शेअर केले होते. ज्यामध्ये हे जोडपं खूपच गोड दिसत होते. या फोटोला मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी व चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद दिला होता.

Tags: deepika padukoneDeepika Padukone DischargeDeepika Padukone Discharge News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Next Post
Bigg Boss Marathi 5 Aarya Jadhav elimination netizens expressed their displeasurement

“आर्यावर अन्याय होत आहे”, ‘बिग बॉस’ने घेतलेल्या निर्णयावर प्रेक्षक नाराज, शो न बघण्याचा पवित्रा घेत म्हणाले, “आम्ही निषेध करतो की...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.