बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे. दोन दिवसांपूर्वी तिला मुंबई एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले होते. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिच्या येण्याचा सगळ्यांनाच आनंद झाला होता. तसेच अनेकांनी प्रतिक्रियादेखील दर्शवल्या होत्या. अनुष्का भारतात का आली? तसेच ती आपल्या दोन्ही मुलांना ठेऊन कशी काय आली? असे अनेक प्रश्नदेखील तिला विचारले गेले. अशातच एका इव्हेंटच्या दरम्यान ती दिसून आली. यावेळी तिने कुटुंबाबद्दल भाष्य केले आहे. (anushka sharma on virat kohli)
अनुष्काने भारतात आल्यानंतर एका इव्हेंटला हजेरी लावली होती. यावेळी तिने नवरा विराट कोहलीबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यामुळे सगळेच जण आता विराटचे कौतुक करत आहेत. ती म्हणाली की, “आम्ही नेहमी चर्चा करतो की आमच्या आईने आम्हाला जे काही खायला दिलं, ते जर आम्ही घरी नाही बनवलं तर आम्ही ते आमच्या मुलांना देऊ शकणार नाही. त्यामुळे कधी कधी मी जेवण बनवते तर कधी कधी विराट जेवण बनवतो. जसं आमच्या आईने जसं आम्हाला दिलं तसंच आम्ही बनवण्याचा प्रयत्न करतो. मी कधीतरी माझ्या आईला एखादी रेसिपी विचारते. यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना काहीतरी मौल्यवान देत असता”.
तसेच विराट व अनुष्का हे आपल्या मुलांना घेऊनदेखील फिरताना दिसतात. यावेळी ती सगळं रुटीन कसं करते याबद्दलही तिने भाष्य केले आहे. तिने सांगितले की, “मी माझ्या रुटीनच्या बाबतीत खूप कडक शिस्तीची आहे. आम्ही अनेकदा कुटुंबाबरोबर ट्रीपवर जातो तेव्हा आम्ही खूप एंजॉय करतो. त्यामुळे त्यांच्यासाठी एक एक रुटीन बनवते. आमच्या जेवणाच्या वेळा ठरलेल्या आहेत. कुठेही असलो तरीही आम्ही ठरलेल्या वेळी जेवतो आणि झोपतो. यामुळे आम्हाला खूप चांगले आयुष्य जगण्यास मदत मिळाली आहे”.
दरम्यान फेब्रुवारीमध्ये अकायला जन्म दिल्यानंतर दुसऱ्यांदा अनुष्का भारत दौरा करत आहे. याआधी मी महिन्यात ती आयपीएल मॅचच्या वेळी दिसून आली होती. मात्र आता अनुष्का व विराट आपल्या मुलांसहित कायमचे लंडनला स्थायिक झाल्याच्या अफवा सुरु आहेत.