ऐश्वर्या राय बच्चन व अभिषेक बच्चन यांचे वैयक्तिक आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दोघांनी अनंत अंबानीच्या लग्नात वेगवेगळी एण्ट्री घेतल्याने या चर्चांना उधाण आले. यादरम्यान, अभिषेकने घटस्फोटासंबंधित एक पोस्ट लाइक केली ज्यामुळे या जोडप्यामध्ये काय चालले असेल असा प्रश्न सर्वांनाच पडला. बच्चन कुटुंबातील कौटुंबिक कलहाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून ऐकू येत होत्या. दरम्यान, एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये ऐश्वर्या तिचे सासरे अमिताभ यांच्या यशानंतर आनंदाने उड्या मारताना आणि टाळ्या वाजवताना दिसत आहे. इतकंच नव्हे तर नेटकरी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत आहेत. (Aishwarya Rai On Amitabh Bachchan)
नुकताच ऐश्वर्या रायचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ‘पा’ चित्रपटातील अभिनयासाठी अमिताभ बच्चन यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. शिवाय, अमिताभ यांच्या नावाची घोषणा होताच त्यांची सून ऐश्वर्या लगेच उभी राहिली आणि आनंदाने टाळ्या वाजवू लागली आणि यावरुन तिला सासरचा किती अभिमान आहे हे सिद्ध होते. व्हिडीओमध्ये, जया बच्चन, श्वेता बच्चन व अभिषेक बच्चन हे देखील दिसत आहेत आणि ते सर्व खूप आनंदी दिसत होते. अभिनेत्याने उभे राहून सर्वांना नमस्कार केला आणि ऐश्वर्या यावेळी सर्वात आनंदी दिसत होती.
ससुर अमिताभ बच्चन को अवॉर्ड मिलने पर खुशी से उछली थीं ऐश्वर्या राय #AishwaryaRai #AmitabhBachchan pic.twitter.com/mUYLpy6Cb2
— NBT Entertainment (@NBTEnt) July 21, 2024
हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी कमेंटचा भडीमार सुरु केला. काही वापरकर्त्यांना ऐश्वर्याच्या सौंदर्याची भीती वाटत होती, तर काहींना आश्चर्य वाटले की तिच्या सासरच्या लोकांमध्ये काय चूक झाली असेल कारण हे जोडपे नेहमीच लोकप्रिय राहिले. एका यूजरने लिहिले की, “पहा एबीसाठी ही किती आनंदी आणि अभिमानास्पद गोष्ट होती”. तर एका यूजरने लिहिले आहे की, “जेव्हा ऐश कुटुंबाचा एक भाग होती तेव्हा किती आनंद होता”. तर तिसऱ्या यूजरने लिहिले आहे की, “ऐश खूपच सुंदर आहे”.
अनंत अंबानींच्या लग्नात ऐश्वर्या व अभिषेक स्वतंत्रपणे पोहोचले तेव्हा अनेक लोकांमध्ये चर्चा सुरु झाली. कौटुंबिक कलहाच्या बातम्यांमुळे अभिनेत्रीने तिच्या सासरच्यांबरोबर फोटोही काढला नाही. ज्यामुळे लोकांना आश्चर्य वाटले की ते खरोखरच वेगळे होत आहेत का?. मात्र या गोष्टींपासून अभिषेक आणि ऐश्वर्याच्या चाहत्यांना दिलासा मिळाला कारण त्यांच्या घटस्फोटाचा इशारा म्हणून ज्या पोस्टचा नेटकरी विचार करत होते तेव्हा तो अभिनेत्याने पत्नीला दिलेला पाठिंबा होता.