‘गली बॉय’ या चित्रपटातून एक नवा चेहरा समोर आला होता. तो नवा चेहरा म्हणजे सिद्धांत चतुर्वेदी. या चित्रपटाच्या माध्यमातून त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. पण या चित्रपटाच्या आधी त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. त्याबद्दल त्याने आता दिलखुलास भाष्य केले आहे. त्याने आपल्या करिअरच्या सुरुवातीला कोणत्या समस्याना सामोरे जावे लागले होते याबद्दल त्याने सांगितले आहे. दरम्यान त्याच्या लूकमुळे अनेक चिटपटांमधून त्याला बाहेरचा रस्ता दाखवला गेला होता हे देखील त्याने स्पष्ट केले आहे. (bollywood actor siddhant chaturvedi )
‘द लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, “माझे केस खूप कुरळे असल्याने अनेक ऑडिशनमधून नकार मिळाला. कुरळे केस असणारे मुख्य भूमिका करु शकत नाहीत असा ट्रेंड सेट केला होता”, असे त्याने सांगितले.
आणखी वाचा – एमसी स्टॅन रॅप करणं सोडणार; स्वतःनेच पोस्ट शेअर करत दिली माहिती, चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर, पण नक्की घडलं काय?
पुढे तो म्हणाला की, “अनेक ऑडिशन दिल्यानंतरदेखील सर्व प्रक्रिया पूर्ण करुन केवळ लूकच्या आधारावर मला नाकारले जात असे. कुरळे केस आहेत त्यामुळे मुख्य भूमिका मिळणे कठीण आहे पुन्हा प्रयत्न केलं पाहिजे असे सांगितले जायचे”. तसेच दिसण्यावरुन या क्षेत्रातच नाही तर शाळेमध्येदेखील या समस्येचा सामना करवा लागला होता.
त्याने शाळेमध्ये आलेल्या समस्येबद्दल सांगितले की, “माझे केस कुरळे असल्याने मला खूप त्रास दिला गेला. सर्व मुलं मला माझ्या केसांवरुन चिडवत असत”. त्यामुळे शाळेत व मनोरंजन क्षेत्रात त्याला खूप समस्यांचा सामना करावा लागला होता. इतके असतानादेखील त्याने आपले एक वेगळे स्थान चित्रपटसृष्टीमध्ये निर्माण केले आहे.
नुकताच तो ‘खो गए हम कहा’ याचित्रपटामध्ये दिसून आला होता. यामध्ये त्याच्याबरोबर अनन्या पांडे, आदर्श गौरव हेदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये दिसले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. अनेक मोठ्या कलाकारांनी या चित्रपटाचे कौतुक केले होते. तसेच आता ‘युधरा’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसून येणार आहे. यामध्ये त्याच्याबरोबर मालविका मोहन, राघव जुयाल, गजराज राव व राम कपूर हे दिसणार आहेत.