बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सलमान खानचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. गणेश चतुर्थीच्या आधी बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने मुंबईतील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी बोलताना अभिनेत्याने आपल्या चाहत्यांना घरी इको-फ्रेंडली बाप्पांची मूर्ती आणण्याचे आवाहन केले आणि गाण्यावर ठेका धरत प्रेक्षकांची मनं जिंकली. सलमानने २००९ मध्ये आलेल्या ‘वॉन्टेड’ चित्रपटातील त्याच्या प्रसिद्ध ट्रॅक ‘जलवा’वरही डान्स मूव्ह केल्या. अनेक नेटकऱ्यांनी त्याचा हा डान्स पाहून त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला, तर अनेकांनी अभिनेत्याला ट्रोल केले. काही लोकांना असे वाटले की त्याला नाचायला भाग पाडले गेले, तर काहींना त्याच्या वयामुळे, वजनामुळे लाज वाटली असल्याचं म्हणत त्याच्या शरीरावर टिप्पणीही केली. (Salman Khan Injured)
कार्यक्रमाच्या होस्टने सांगितल्यानुसार सलमान खान बरगडीच्या दुखापतीने त्रस्त आहे. उपचार सुरु असतानाही त्याने कार्यक्रमात सहभाग घेतला. इंटरनेटवरील चर्चांनुसार, भाईजानला बरे होण्यासाठी विश्रांतीची गरज असल्याने त्याच्या पुढच्या ‘सिकंदर’ चित्रपटाचे शूटिंगही थांबवण्यात आले आहे. हे कळल्यानंतर आता अनेक चाहते सलमानच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. सलमानचा डान्स पाहून चाहत्यांनी चांगलीच कानउघडणी केली आणि काहींनी त्याला ‘घायल सिंह’ असेही म्हटले.
आणखी वाचा – घटस्फोटानंतर नागा चैतन्यच्या दुसऱ्या लग्नाची तयारी, थाटामाटात लग्न करण्यास नकार, म्हणाला, “त्या लोकांसाठी…”
सलमानच्या कामाचे कौतुक करताना एका सोशल मीडिया यूजरने म्हटले, “जखमी सिंहाची गर्जना खूप धोकादायक आहे”. तर एकाने ट्विट केले, “अल्लाह तुझ्या वाटेत येणारी सर्व वेदना दूर करो भाऊ. जशा तू गरीब व गरजूंच्या सर्व वेदना कमी करतोस”. सलमानची सह-अभिनेत्री रश्मिका मंदान्नाच्या चाहत्यांनीही भाईजानला शुभेच्छा दिल्या. एका फॅन पेजने पोस्ट शेअर करत म्हटलं की, “आताच ऐकले की आमचे आवडते सलमान खान यांची तब्येत बरी नाही आणि त्यामुळे त्यांच्या सिकंदर या चित्रपटाचे शूटिंग देखील थांबवण्यात आले आहे. हे ऐकून वाईट वाटले. त्याला लवकर बरे वाटावे हिच प्रार्थना”.
आणखी वाचा – “घटस्फोटानंतरही एक्सला लाडाने हाक मारायची अन्…”, कंगना रणौतने आमिर खानला सुनावलं?, म्हणाली, “मी कधीही…”
सलमान त्याच्या लाखो चाहत्यांसाठी प्रेरणास्थान आहे. तो लवकरच त्याच्या ‘सिकंदर’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. चित्रपटाचे शूटिंग सध्या थांबवण्यात आले आहे. या चित्रपटात त्याच्यासह अभिनेत्री रश्मिका मंदान्ना झळकणार आहे.