शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ख्रिसमसच्या दिवशी रणबीर कपूर व आलिया भट्टच्या लेकीने जिंकली मनं, पापाराझींना पाहून दिले फ्लाइंग किस, व्हिडीओ व्हायरल

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 25, 2024 | 5:38 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
raha kapoor viral video

राहा कपूरचा व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर व अभिनेत्री आलिया भट्ट यांची लाडकी लेक राहा कपूर ही सध्या खूप चर्चेत असलेली बघायला मिळत आहे. गेल्या वर्षी नाताळच्या दिवशी या जोडीने राहाला पाहिल्यांदा मीडियासमोर आणले. यावेळी राहाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नेटकऱ्यांनी राहाच्या सर्वच फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केला होता. अनेकांनी तर राहाला बघितल्यानंतर दिवंगत अभिनेते व राहाचे आजोबा ऋषि कपूर यांच्यासारखी दिसत असल्याचे म्हंटले. त्यानंतर अनेकदा राहा तिच्या घरच्या मंडळींबरोबर स्पॉट झाली. अशातच आता पुन्हा एकदा नाताळ निमित्ताने स्टारकीडचा नवीन व्हिडिओ समोर आला आहे. (raha kapoor viral video)

राहा पुन्हा एकदा आई-वडिलांबरोबर दिसून आली. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये राहा रणबीरकडे असल्याचे दिसून येत आहे. मात्र राहाने केलेल्या कृतीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. रणबीर, आलिया व राहा एकत्रित ख्रिसमस पार्टीसाठी जाताना दिसून आले. राहाला हलक्या गुलाबी रंगाचा फ्रॉक परिधान करण्यात आला होता. यामध्ये ती खूपच गोड असलेली दिसून आली. राहा गाडीतून उतरण्याआधी आलियाने सर्व पापाराजीना आवाज कमी करण्याची विनंती केली. नंतर रणबीर राहाला घेऊन गाडीतून खाली उतरला. त्यानंतर लगेचच पापाराजीनी राहाला हॅलो बोलण्यास सुरुवाट केली. त्यानंतर रणबीरने राहाला काहीतरी सांगितले तेव्हा लगेच राहाने रणबीरला मिठी मारली.

आणखी वाचा – तेजश्री प्रधानच्या चित्रपटाला महाराष्ट्रातच मिळेना थिएटर, अभिनेत्री भडकली, म्हणाली, “दुर्दैव आहे की…”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

नंतर राहा जेव्हा जाऊ लागली तेव्हा तिने पापाराजीना मोठ्याने हाय म्हंटलं आणि त्यांच्याकडे बघून फ्लाइंग किस देऊ लागली. राहाची ही गोड कृती कॅमेरामध्ये कैद झाली. तिच्या गोड वागण्याने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच सगळेच नेटकरी राहाचे कौतुकदेखील करताना दिसत आहेत.

आणखी वाचा – ब्लॉकबस्टर ‘पुष्पा २’चे दिग्दर्शक सुकुमार सोडणार चित्रपटसृष्टी?, व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांचा अल्लू अर्जुनवर निशाणा, म्हणाले, “हा जबाबदार…”

प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्स रणबीर कपूर व आलिया भट्ट यांची मुलगी राहा ही सर्वात प्रसिद्ध स्टार किड आहे. ती कुठेही गेली तरी तिची एक झलक पाहण्यासाठी पापाराझी आतुर असतात आणि राहाची छायाचित्रे सोशल मीडियावर येताच तिचे फोटो वाऱ्यासारखे पसरतात. 

Tags: alia kapoorraha kapoorranbir kapoor
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Amruta Joshi Amdekar who completed her son education through homeschooling without sending her to school

मुलाला शाळेतच न पाठवणारी आई, नेमकं कसं सुरु आहे लेकाचे शिक्षण?, जाणून घ्या रंजक प्रवास...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.