शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्याचा मुंबईमध्ये मोठा अपघात, वांद्रेमधील रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल, प्रकृती गंभीर

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 21, 2024 | 1:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bollywood actor Pravin Dabas mumbai accident and he is undergoing treatment in hospital

बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्याचा मुंबईमध्ये मोठा अपघात, अपघातानंतर वांद्रे येथील रुग्णालयात केलं भरती

Pravin Dabas Accident : बॉलिवूड अभिनेता प्रवीण डबासचा भीषण कार अपघात झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. प्रवीण डबासचा भीषण कार अपघात झाला असून त्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. गंभीर जखमी अवस्थेत अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शनिवारी सकाळी मुंबईत प्रवीण डबासचा कार अपघात झाला. अपघातानंतर प्रवीणला मुंबईतील वांद्रे येथील रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आलं आहे आणि त्याच्यावर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. अभिनेत्याबरोबर सध्या त्याची पत्नी अभिनेत्री प्रीती झांगियानी आहे. (Pravin Dabas Accident)

प्रवीण हा आर्म रेसलिंग प्रो पंजा लीगचा सह-संस्थापक आहे. प्रो पंजा लीगने अभिनेत्याच्या अपघाताच्या निवेदनात असं म्हटलं आहे की, “प्रो पंजा लीगचे सह-संस्थापक प्रवीण डबास यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे आम्हाला दुःख होत आहे. शनिवारी सकाळी झालेल्या दुर्दैवी कार अपघातानंतर त्यांना वांद्रे येथील होली फॅमिली हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टर त्यांचे प्रयत्न करत आहे. त्यामुळे या कठीण काळात प्रवीण आणि त्याच्या कुटुंबियांबरोबर आम्ही आहोत”.

View this post on Instagram

A post shared by Parvin Dabas (@dabasparvin)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “भाईमुळे डोकं चक्रावलं”, उत्कर्ष शिंदेचा संग्रामला टोला, मतावर ठाम नसल्यामुळे म्हणाला, “मेडिकल रुमचं दार…”

यापुढे या निवेदनात असं म्हटलं आहे की, “या कठीण काळात प्रवीण आणि त्याच्या कुटुंबाच्या गोपनीयतेची काळजी घ्यावी. प्रवीण लवकर बरा व्हावा अशी इच्छा आम्ही व्यक्त करत आहोत”. मेडिकल अपडेटनुसार, प्रवीणला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला सीरियस कंसशन म्हणजेच मेंदूला गंभीर दुखापत झाल्यानंतरच्या स्थितीत आहे. त्याला आणखी दुखापत झाली आहे का, हे पाहण्यासाठी डॉक्टरांकडून सीटी स्कॅन आणि इतर चाचण्या करण्यात येत आहेत. तो या क्षणी जास्त हालचाल करू शकत नाही. अपघातापूर्वी तो त्याच्या कामात फार व्यस्त होता.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : कॅप्टनसीमुळे अरबाज सुरक्षित, आता नक्की घराबाहेर कोण जाणार?, वेगवेगळ्या नावांची चर्चा

दरम्यान, बॉलिवूड अभिनेता प्रवीण डबासचे वय ५० वर्ष आहे. अभिनेता अनेक चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिकांमध्ये दिसला आहे. प्रवीणने आतापर्यंत ‘दिल्लगी’, ‘मान्सून वेडिंग’, ‘खोसला का घोंसला’, ‘द हीरो : लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय’, ‘मैने गांधी को नही मारा’, ‘ये है जिंदगी’, ‘कुछ मीठा हो जाए’, ‘इंदू सरकार’, ‘रागिनी एमएमएस 2’ आणि अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Tags: bollywood actorPravin DabasPravin Dabas Accident
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
bhumija patil won home minister paithani

'नवरी मिळे हिटलरला' फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीने पटकावली सव्वा लाखाची पैठणी, सहअभिनेत्रींनी उचलून घेतलं अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.