Govinda and sunita ahuja news : बॉलिवूड अभिनेता गोविंदा त्याच्या पत्नीने केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आला आहे. पत्नी सुनीता आहुजाने एका मुलाखतीत दिलेल्या वक्तव्यामुळे गोविंदा सतत चर्चेत असलेला दिसला. आता या दिग्गज अभिनेत्याने या दाव्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. गोविंदाने एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले असून ते निराधार असल्याचे म्हटले आहे. गोविंदाने सुनीताचे वर्णन त्याचे ‘बालपणीचे प्रेम’ असे केले आहे. आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या आरोपावर गोविंदाने मौन सोडले आहे.
एएनआयला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाने पत्नी सुनीता आहुजाने केलेल्या आरोपांवर खुलेपणाने भाष्य केले. अभिनेता म्हणाला, “माझ्यावर आरोप कधी होणार नाहीत?”. यानंतर तो भावुक स्वरात म्हणाला, “जो आरोप करत आहे तेच माझं बालपणीचं प्रेम आहे”. गोविंदाने पुढे प्रेमाच्या मुद्द्यावर आपले मत मांडले आणि हे संपूर्ण प्रकरण चुकीच्या पद्धतीने मांडले जात असल्याचे स्पष्ट केले. गोविंदा पुढे म्हणाला, “प्रेमाच्या गोष्टी कधीच नीट चालत नाहीत. एखाद्याच्या विचारानुसार सध्या होत असलेले प्रेम म्हणजे म्हातारपणाचे प्रेम”. अभिनेत्याच्या या वक्तव्यानंतर त्याची प्रतिक्रिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याच संवादात गोविंदाने त्याच्या व्यावसायिकतेबद्दलही मोकळेपणाने बोलले.
अभिनेत्याने सांगितले की, त्याने आपल्या सह-अभिनेत्रींसोबत कधीही गैरवर्तन केले नाही. गोविंदा म्हणाला, “मी चार सुपरस्टार आणि मिस युनिव्हर्स अभिनेत्रींसोबत काम केले आहे, पण मी त्यांच्याकडे कधीही वाईट नजरेने पाहिले नाही. माझी कोणतीही हिरोईन असे म्हणू शकत नाही की मी त्यांना कधीही त्रास दिला आहे किंवा कोणाच्या विरोधात अपशब्द वापरले आहेत. मी सर्व कलाकार आणि अभिनेत्रींचे आभार मानतो”.
आणखी वाचा – हळद लागली! विशाल-अक्षयाच्या हळदी समारंभाचा थाट, पारंपरिक पद्धतीने पार पडला कार्यक्रम; फोटो समोर
गोविंदा पुढे म्हणाला, “मी जे काही चित्रपट केले त्याबद्दल मी माझ्या दिग्दर्शकांचा, चित्रपटांची गाणी आणि माझ्या नायिकांचा आभारी आहे”. संवादादरम्यान गोविंदा म्हणाला, “माझी आई स्वतः हिरोईन होती, त्यामुळे मी कधीही कोणत्याही हिरोईनशी गैरवर्तन केले नाही. आता ती (सुनीता आहुजा) माझे नाव घेत आहे पण मी सर्व काही पाहिले आहे आणि मला असे शब्द आवडत नाहीत”.





