शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अनुपम खेर यांच्या ऑफिसमध्ये चोरी, रोख रक्कमेसह काही वस्तू लंपास, अभिनेत्याने व्हिडीओद्वारे दाखवलं सत्य

Saurabh Moreby Saurabh More
जून 21, 2024 | 10:31 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Anupam Kher's office has been robbed

अनुपम खेर यांच्या ऑफिसमध्ये चोरी, रोख रक्कमेसह काही वस्तू लंपास, अभिनेत्याने व्हिडीओद्वारे दाखवलं सत्य

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांच्याबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अनुपम खेर यांच्या कार्यालयावर दोन चोरट्यांनी चोरी केली आहे. काल म्हणजेच बुधवार २० जून रोजी रात्री चोरट्यांनी अभिनेत्यांच्या कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी अनुपम खेर यांच्या कार्यालयातून लाखो रुपयांची रोख रक्कम आणि काही मौल्यवान सामानही चोरून नेले आहे. या घटनेबद्दल स्वत: अनुपम खेर यांनी एक व्हिडीओ पोस्ट करून ही माहिती दिली आहे.

मुंबईतील अंधेरीमधील वीरा देसाई रोडवरील अनुपम खेर यांच्या कार्यालयात ही चोरी झाली. अभिनेत्याने चोरांविरोधात एफआयआरही दाखल केला आहे. चोरट्यांनी लाखो रुपयांच्या रोकडसह काही वस्तू आणि एका त्यांच्या चित्रपटाचे अनेक निगेटिव्ह साहित्य चोरून नेले आहे. चोरीच्या घटनेची माहिती देताना अनुपम खेर यांनी इन्स्टाग्राम व एक्स या दोन्ही सोशल मीडिया अकाऊंटद्वारे एक व्हिडीओही शेअर केला आहे. 

View this post on Instagram

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

अनुपम खेर यांनी चोरीच्या घटनेचा व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं आहे की, “काल रात्री वीरा देसाई रोडवरील माझ्या ऑफिसमध्ये दोन चोरट्यांनी माझ्या ऑफिसचे दोन दरवाजे तोडले आणि लेखा विभागातील संपूर्ण तिजोरी (जे कदाचित ते फोडू शकले नाहीत) घेऊन गेले. तसेच आमच्या कंपनीने निर्मिती केलेल्या एका चित्रपटाची निगेटिव्हही चोरून घीऊं गेले आहेत”.

आणखी वाचा – नेत्राच्या बाळाला जीवे मारण्यात विरोचक यशस्वी होणार का? नेमका कुणाचा बळी जाणार? मालिकेला नवं वळण

यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “आम्ही या घटनेबद्दल चोरांविरोधात पोलिसांत एफआयआर दाखल केलं असून लवकरच चोर पकडले जातील असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. कारण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोघेही सामानासह रिक्षामध्ये बसलेले दिसले आहेत. ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो. हा व्हिडिओ पोलिस येण्यापूर्वी माझ्या ऑफिसच्या लोकांनी बनवला होता”.

आणखी वाचा – ‘तारक मेहता…’मधून गोलीचाही काढता पाय, १६ वर्ष काम केल्यानंतर मालिका सोडण्याचा निर्णय कारण…

अनुपम खेर यांनी ETimes ला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं की, “एका पिशवीत होते निगेटिव्ह रील होते. त्या निगेटिव्हला पैसे समजून त्यांनी ती पिशवी चोरली असावी. ४ लाखग रुपयांची रोख रक्कमदेखील चोरली आहे ते एक जुने आहे. ही एक जुनी इमारत  असून यात काही सीसीटीव्ही कॅमेरादेखील आहे. यातील फुटेजनुसार यात दोन लोकांचा सहभाग असल्याचे दिसत आहे. तसेच या चोरांचा तपास लावण्याचे पोलिसांनी आश्वासनही दिले आहे”.  

Tags: anupam kherAnupam Kher Office Robbed Anupam Kher Office Robbed NewsAnupam Kher Robbed Marathi News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Paaru serial update

वडाची पूजा करताना अहिल्यादेवींच्या पदराला लागली आग, पारू यातून त्यांची सुखरुप सुटका करेल का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.