Akshay Kumar Mahakumbh : उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरु असलेला महाकुंभमेळा येत्या २६ फेब्रुवारी रोजी समाप्त होणार आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात भाविकांनी त्रिवेणी संगम येथे पवित्र स्नान करण्यासाठी गर्दी करण्यास सुरुवात केला आहे. कुंभमेळ्याला काही दिवस शिल्लक राहिले असल्याने महाशिवरात्रीच्या आधी मोठ्या प्रमाणावर भाविक प्रयागराज येथे दाखल होत आहेत. अशातच या महाकुंभ मेळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. बॉलिवूडमधील अनेक कलाकार या महाकुंभ मेळ्यात सहभागी झालेले दिसले. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळाले. अशातच अभिनेता अक्षय कुमारही महाकुंभ मध्ये सामील झाला होता आणि संगमात स्नान करताना दिसला.
नुकताच अक्षय कुमार प्रयाग्राज येथे पोहोचला आणि महाकुंभ येथे दर्शन घेतानाचे अनेक फोटो समोर आले. या व्हिडीओमध्ये अक्षय प्रचंड गर्दीत भक्ती आत्मसात करताना दिसला. त्याच वेळी, त्याच्या भोवतीही सुरक्षा पाहायला मिळाली. अक्षय कुमार या व्हिडीओमध्ये उपासना करताना दिसला. यावेळी त्याच्या आजूबाजूचे लोक अभिनेत्याला पाहण्यासाठी गर्दी करताना दिसले.
#WATCH | Actor Akshay Kumar takes a holy dip in Sangam waters during ongoing #Mahakumbh in UP's Prayagraj pic.twitter.com/rHRM1XrEB0
— ANI (@ANI) February 24, 2025
आज २४ फेब्रुवारी रोजी महाकुंभचा ४३ वा दिवस आहे आणि दोन दिवसांनंतर तो संपणार आहे. गेल्या दोन दिवसांत, येथील गर्दी बरीच वाढली आहे आणि कोटी लोक प्रयाग्राजच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. महाकुंभ दरम्यान, देश आणि जगातील कोटी लोक आपल्यापर्यंत पोहोचले आहेत आणि मोठ्या संख्येने उर्वरित दोन दिवसात येण्याची अपेक्षा आहे. सामान्य लोकांसह, चित्रपट आणि टेलिव्हिजन कलाकारांनीही या महाकुंभमध्ये भाग घेतला.
आतापर्यंत बॉलिवूडचे बरेच कलाकार ‘महाकुंभ २०२५’ मध्ये सामील झाले आहेत, ज्यात अदा शर्मा, अनुपम खेर, बोनी कपूर, मिलिंद सोमण, कबीर खान, रेमो डिसूझा, गुरु रंदवा, सपना चौथरी, ममता कुलकर्णी, नीना गुप्ता , राजकुमार राव, शेट्टी, सोनल चौहान, श्रीनिधी शेट्टी, तनिषा मुखर्जी या कलाकारांचा समावेश आहे.