यंदाचे ‘बिग बॉस’चे अठरावे पर्व अधिक चर्चेत राहिले आहे. अभिनेता करणवीर मेहरा या पर्वाचा विजेता झाला. करणवीरच्या विजयाने अनेकांना मोठा धक्का बसला. तसेच विवियन डीसेना हा उपविजेता ठरला. विवियन विजेता होईल अशा चर्चा सर्वत्र सुरु होत्या. मात्र तो विजयी होऊ शकला नाही. विवियन विजेता न झाल्याने त्याच्या चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात हिरमोड झाला. या कार्यक्रमानंतर विवियनच्या घरी पार्टीचे आयोजन केले गेले. त्याच्या पार्टीला त्याचे अनेक मित्र-मंडळी व ‘बिग बॉस’मधील सदस्यांनी हजेरी लावली होती. मात्र यामध्ये करणवीर कुठेही दिसून आला नाही. याबद्दल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चादेखील झाली. (vivian dsena party)
विवियनच्या घरी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये चुम दरांग व करणवीर मेहरा दिसून आले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीमुळे अधिक प्रश्न चाहत्यांसामोर उभे राहिले. विवियनने नुकताच माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्याला विचारले की, “चुम व करणवीरला का बोलावलं नाही?”, मात्र या प्रश्नाकडे विवियनने पूर्णतः दुर्लक्ष केलं. त्याच्या या कृतीने विवियन, चुम व करणवीर यांच्यामध्ये मतभेद असल्याचे उघड झाले.
आणखी वाचा – Bigg Boss फेम प्रसिद्ध युट्यूबवर FIR नोंदवण्याचे कोर्टाचे आदेश, पाठलाग व धमकीचा आरोप
‘बिग बॉस’मध्ये विवियन व करणवीर यांच्यामध्ये मतभेद असल्याचे दिसून आले होते. त्यांच्यामध्ये नेहमीच भांडणं व्हायची.तसेच करणवीर मित्र नाही आणि या शोनंतर करणवीरला भेटणार नसल्याचेही विवियनने सांगितलं होतं. मात्र चुम, शिल्पा व श्रुतिका यांच्याबरोबर चांगले संबंध होते. तरीही त्या पार्टीमध्ये अनुपस्थित दिसल्या. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक चर्चाना उधाण आले आहे.
आणखी वाचा – Bigg Boss फेम प्रसिद्ध युट्यूबवर FIR नोंदवण्याचे कोर्टाचे आदेश, पाठलाग व धमकीचा आरोप
तसेच याबद्दल करणवीरने नुकताच एका मुलाखतीमध्ये पार्टीमध्ये न जाण्याबद्दल आणि विवियनला ट्रॉफीला हात लाऊ न दिल्याबद्दल प्रश्न विचारले. त्यावर त्याने उत्तर दिले की, “मी जाणूनबुजून काहीही केलं नाही. ट्रॉफी खूप जड होती. त्यामुळे मी त्याच्या हातात माइक दिला. मी काहीही ठरवून केलं नाही”. दरम्यान करणवीरच्या या कृतीने विवियनचे चाहते खूप नाराज झालेले बघायला मिळाले. तसेच विवियनला कमीपणा यावा यासाठी करणने असं केलं असंही नेटकऱ्यांनी म्हंटलं आहे. मात्र असं काहीही नसल्याचे करणने स्पष्ट केले.