शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : आर्याची जेलमध्ये रवानगी, भाऊच्या धक्क्यावर ‘बिग बॉस’ मोठी शिक्षा सुनावणार, घराबाहेर काढणार का?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 14, 2024 | 9:32 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi Season 5

'बिग बॉस मराठी'च्या घरात आर्या जाधवची जेलमध्ये रवानगी

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाचा सातवा आठवडा सुरु असून या पर्वात स्पर्धक मंडळी तुफान राडे करताना दिसत आहेत. टोकाच भांडण आता मारामारी पर्यंत येऊन पोहोचलेल पाहायला मिळतंय. मात्र ‘बिग बॉस’च्या घरात एखाद्या स्पर्धकाला हिंसा करणं हे अत्यंत चुकीच आणि निंदनीय आहे. नियमानुसार हा प्रकार करणे नियमाचे उल्लंघन आहे हे साऱ्यांनाच माहित आहे. अशातच ‘बिग बॉस’च्या घरात एका घडलेल्या घटनेने साऱ्यांचे लक्ष वेधलं आहे. ही घडलेली घटना म्हणजेच ‘जादुई टास्क’ दरम्यान निक्की व आर्या यांच्यात झालेली मारामारी अत्यंत निंदनीय होतो. (Bigg Boss Marathi Season 5)

निक्की व आर्या यांनी टास्क दरम्यान एकमेकांशी हुज्जत घातली आणि या दरम्यान आर्याचा राग अनावर झाला. आणि तिने तिच्या सणसणीत कानाखाली लगावली. जादुई टास्क दरम्यान वर्षा उसगांवकर, जान्हवी किल्लेकर, अंकिता वालावलकर हे सगळे स्पर्धक हिऱ्याची राखण करत असताना निक्की मध्ये येते. तेव्हा आर्या तिला अडवण्याचा प्रयत्न करते. निक्कीला आर्या खेळूच देत नाही त्यावेळेला निक्कीसुद्धा जोर लावत आर्याला धक्का मारते. या धक्काबुक्की मध्येच आर्याचा पारा सुटतो आणि ती निक्कीच्या थोबाडीत लगावते. त्याच वेळेला अरबाज, वैभव, निक्की सगळेच ओरडत घराबाहेर जातात आणि सांगतात की, ‘बिग बॉस’ आर्याने थोबाडीत मारली.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “स्वतःला काय समजता?”, आर्याने नियम तोडल्याने रितेश देशमुखचा पारा चढला, म्हणाला, “जाणून बुजून…”

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

निक्कीही संताप व्यक्त करत म्हणते, ‘बिग बॉस’ आर्याने माझ्या कानाखाली मारली आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. तर हिला आताच्या आता घराबाहेर काढा नाही तर मला तरी काढा, असं म्हणत निक्कीला अश्रू अनावर होतात. तर आर्याची ही चूकच झालेली असते. आर्याने संताप व्यक्त करत निक्कीच्या कानाखाली लावली हे अत्यंत चुकीचं झालं. ‘बिग बॉस’ने हा खेळ तिथेच थांबवला आणि कॅप्टनसी टास्क रद्द केला. त्यानंतर ‘बिग बॉस’ने सगळ्या स्पर्धकांना लिविंग एरियामध्ये बोलावलं आणि ही घटना अत्यंत निंदनीय असल्याचे सांगितलं. आर्याला शिक्षा म्हणून ‘बिग बॉस’ यांनी जेलमध्ये राहण्यास सांगितले. आर्या या आठवड्यापर्यंत जेलमध्ये जाईल आणि भाऊच्या धक्क्यावर आर्याला शिक्षा मिळेल असे जाहीर केलं.

आणखी वाचा – “अभी तो खेल शुरु हुआ हैं”, अरबाजला अजगर म्हणत विशाखा सुभेदारांची पॅडीसाठी खास पोस्ट, खेळाचं कौतुकही केलं, म्हणाल्या, “त्याच तंगड्या…”

सर्व सदस्य लिव्हिंग एरियामध्ये बसलेले असतात. तेव्हा आर्या आणि निक्कीमध्ये हातापायी होत ‘बिग बॉस’च्या घराच्या नियमांचं उल्लंघन झालं असल्याकारणाने याचा अंतिम निर्णय भाऊच्या धक्क्यावर घेतला जाईल, असं बिग बॉस सांगतात. तोवर आर्याला या आठवड्यात जेलची शिक्षा दिली जाते. या सगळ्यामुळे कॅप्टन्सी कार्य रद्द होतं. आर्याने निक्कीला मारल्याबद्दल इतर सदस्य चर्चा करत असतात. ‘बिग बॉस’ कॅप्टन सूरजला आर्याला जेलमध्ये बंदिस्त करायला सांगतात. अभिजीत आणि अंकिता, आर्याची समजूत काढतात.

Tags: arya jadhav and nikki tamboli fightbigg boss marathibigg boss marathi season 5
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 Celebs Live In Rented Houses
Entertainment

कोट्यवधी कमावतात तरीही कलाकार भाड्याच्या घरात का राहतात?, कारण ऐकून व्हाल थक्क, जाणून घ्या…

जून 6, 2025 | 1:30 pm
Varun Badola on ekta Kapoor serial
Entertainment

“कथा न बघता फक्त पैसे कमवत राहिली अन्…”, एकता कपूरवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, तिच्याच मालिकांमध्ये काम करुनही…

जून 6, 2025 | 1:02 pm
Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Next Post
Bigg Boss Marathi Season 5

Bigg Boss Marathi : "मी खूप साधा माणूस आहे", पिझ्झा, केकसाठी सूरज चव्हाणचा नकार, म्हणाला, "असे पदार्थ समोर असतात पण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.