Bigg Boss Ott Season 3 Update : ‘बिग बॉस’ हा टीव्हीवरील वादग्रस्त शोपैकी एक असला तरी हा शो सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम आहे. ‘बिग बॉस ओटीटी’ हा शो कंटेटसाठी जितका ओळखला जातो, तितकाच तो घरातील स्पर्धकांसाठीही ओळखला जातो. ‘बिग बॉस ओटीटी’ जेव्हापासून सुरु झाला तेव्हापासून कोणत्या ना कोणत्या वादामुळे तो चर्चेत राहिला.
अभिनेते अनिल कपूर हा ‘बिग बॉस ओटीटी’चा शो होस्ट करताना दिसत आहेत. उद्या म्हणजेच २ ऑगस्ट रोजी ‘बिग बॉस ओटीटी’चा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. काही महिन्यांपासून हा शो चर्चेत असलेला पाहायला मिळाला.
२ ऑगस्टला ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहेत. तर या पर्वाच्या शेवटच्या आठवड्यातील नॉमिनेशन प्रक्रियेत अरमान मलिक, लवकेश कटारिया हे दोन सदस्य स्पर्धेतून बाद झाले. त्यामुळे आता रणवीर शौरी, सना मकबुल, नेझी, कृतिका मलिक, साई केतन या टॉप पाच सदस्यातून ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या ट्रॉफीवर कोणता स्पर्धक नाव कोरणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहील आहे.
महाअंतिम सोहळा होण्यापूर्वी ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात स्पर्धकांसाठी लाइव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आलं आहे. आणि या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये मराठमोळ्या गायक व रॅपरची धमाल पाहायला मिळाली. संपूर्ण महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांना गुलाबी साडी या गाण्याने भुरळ घातली. संजू राठोडच्या गुलाबी साडीची हवा सर्वत्र पसरलेली पाहायला मिळत आहे. अशातच यंदाच्या ‘बिग बॉस ओटीटी’च्या या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये ‘गुलाबी साडी’ने साऱ्या स्पर्धकांना थिरकायला भाग पाडलं.
‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात होणाऱ्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये मीट ब्रोस, शिबानी कश्यप, निकिता, नकाश अझीझ आणि मराठमोळा गायक संजू राठोडचा परफॉर्मन्स होणार आहे. यावेळी संजू राठोड त्याची सुपरहिट झालेली मराठी गाणी परफॉर्म करणार आहे. यावेळी गुलाबी साडीच्या परफॉर्म्सनने साऱ्यांना भुरळ घातली. संजू राठोडच्या ‘गुलाबी साडी’, ‘नऊवारी पाहिजे’ या गाण्यांवर ‘बिग बॉस ओटीटी’चे स्पर्धक थिरकताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.