शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रेक्षकांना भावतेय ‘सुपर डुपर’ची ‘अंगाई’, शशांक शेंडेंची भूमिका लक्षवेधी, आईच्या मायेला आणि निरागसतेला केलं पुन्हा जिवंत

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 7, 2026 | 12:18 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Super Duper Marathi Movie

प्रेक्षकांना भावतेय ‘सुपर डुपर’ची ‘अंगाई’, शशांक शेंडेंची भूमिका लक्षवेधी, आईच्या मायेला आणि निरागसतेला केलं पुन्हा जिवंत

Super Duper Marathi Movie : ‘झी स्टुडिओज’चा ‘सुपर डुपर’ चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. चित्रपटाच्या कथानकाला मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादासोबतच चित्रपटातील गाण्यांनाही भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. ‘सुपर डुपर’ या चित्रपटातील ‘अंगाई’ हे गाणे प्रदर्शित झाले असून यानिमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत बऱ्याच वर्षांनंतर एक हळवे आणि मनाला भिडणारे अंगाई गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘निजूनी गेला दिस कधीचा.. चांद हा येता..पापण काठी तरली नीज.. थांबव चाळा.. ममता ओली, कुस उतावीळ.. नीज रे बाळा.. असे भावपूर्ण बोल असलेल्या या गाण्याला सध्या प्रेक्षकांकडून विशेष पसंती मिळत असून, चित्रपटगृहात भावनिक वातावरण निर्माण करत आहे.

प्रसिद्ध गायक स्वानंद किरकिरे यांच्या भावपूर्ण आवाजात साकारलेल्या या गाण्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. कुणाल – करण यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला त्यांचेच संगीत लाभले आहे. हे अंगाई गीत आईच्या मायेचा, नात्यांमधील उबदारपणाचा आणि प्रेमाच्या नाजूक भावनांचा सुंदर आविष्कार सादर करते. चित्रपट पाहाताना अनेक प्रेक्षक या गाण्यादरम्यान भावूक होत असल्याचे दिसून येत आहे. प्रेक्षकांना भावणारे हे गाणे सर्व म्युझिक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
चित्रपटातील अभिनेते शशांक शेंडे यांच्या प्रभावी अभिनयाचे प्रेक्षकांकडून कौतुक होत असतानाच, कथानकात ‘अंगाई’ हे गाणे येताच वातावरण अधिकच भावनिक होते. अनेक ठिकाणी प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू तरळल्याचे पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – “काळा नायक नाही चालत”, नायक होण्याच होतं स्वप्न, मराठी अभिनेत्याची न ऐकलेली बाजू, म्हणाला, “नोकरी नसल्याने…”

View this post on Instagram

A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)

दिग्दर्शक समीर आशा पाटील म्हणतात, “हे अंगाई गीत माझ्यासाठी अत्यंत जवळचे आणि भावनिकदृष्ट्या खूप खास आहे. लहानपणी ऐकलेल्या अंगाई गीतांच्या आठवणी, आईची माया आणि त्या काळातील निरागसता या सगळ्या भावना या गाण्यातून पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण नात्यांमधील जिव्हाळा आणि शांतता कुठेतरी हरवून बसलो आहोत, तीच ऊब या गाण्यातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची होती. या गाण्याला मिळत असलेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहाता खूप आनंद होतो”.

आणखी वाचा – वयाच्या ४४ व्या वर्षी मराठी अभिनेत्रीने केलं दुसरं लग्न, साधेपणाने पार पाडला विवाहसोहळा, पतीही आहे कलाविश्वात सक्रिय
‘
‘झी स्टुडिओज’ प्रस्तुत, ‘नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स’ आणि ‘सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स’ निर्मित ‘सुपर डुपर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, ललित प्रभाकर, विदुला चौगुले, शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके, प्रतीक्षा कोते यांच्या प्रमुख भूमिका आहेत. समीर आशा पाटील दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते विजय शिंदे आणि नरेश बोर्डे असून, उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता आहेत. तर संजय जाधव यांनी छायांकनाची जबाबदारी सांभाळली आहे.

स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Jui Gadkari Instagram post

"मानसिक तणावात…", इस्त्राईलच्या लोकांनाही 'ठरलं तर मग'ची भुरळ, जुई म्हणाली, "दिवस रात्र काम…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.