बुधवार, ऑगस्ट 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मानसिक तणावात…”, इस्त्राईलच्या लोकांनाही ‘ठरलं तर मग’ची भुरळ, जुई म्हणाली, “दिवस रात्र काम…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 7, 2026 | 1:55 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Jui Gadkari Instagram post

"मानसिक तणावात…", इस्त्राईलच्या लोकांनाही 'ठरलं तर मग'ची भुरळ, जुई म्हणाली, "दिवस रात्र काम…"

Jui Gadkari Instagram post : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका सुरु झाल्यापासून चर्चेत आहे. टीआरपीच्या शर्यतीत तर या मालिकेने कायमच पहिला क्रमांक पटकावला आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने रसिकांच्या मनात घर केलं आहे. सायली-अर्जुनच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. महाराष्ट्रातच नव्हेतर परदेशांतही या मालिकेची क्रेझ पाहायला मिळते. आणि आता तर इस्त्राईलसारख्या देशांतून जिथे युद्धमय वातावरण आहे तिथून मालिकेला कौतुकाची छाप मिळाली आहे. इस्त्राईलसारख्या देशांतून मानसिक तणाव दूर करण्यासाठी तेथील भारतीय ठरलं तर मग या फॅमिली बेस मालिका पाहण्याला प्राधान्य देतात. आणि याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे पाहून आता जुईनेदेखील त्यांचे आभार मानले आहेत. इतकंच नाहीतर जुईने पोस्ट शेअर करत टीमच्या मेहनतीला सलाम केला आहे.

ते कुटुंबीय असं बोलताना दिसत आहे की, “आम्ही इस्त्रायलमध्ये स्थायिक आहोत. सध्या इथे काय परिस्थिती आहे हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. या युद्धामुळे आम्ही मानसिक तणावात असतो. पण, ‘ठरलं तर मग’ मालिका पाहून छान वाटतं. आम्ही सर्व कुटुंबीय एकत्र मिळून ही मालिका पाहतो. आम्ही कोणताच भाग पाहणं चुकवत नाही, कारण ही मालिका आम्हाला फार आवडते. या मालिकेतील मुख्य जोडी सायली-अर्जुनचा अभिनय आम्हाला खूप आवडतो. याचबरोबर प्रिया सुद्धा फार सुंदर अभिनय करते. तिची भूमिका सुद्धा आम्हाला आवडते. आम्हा सर्वांकडून टीमला खूप-खूप शुभेच्छा”.

आणखी वाचा – लग्नाच्या चार महिन्यांनी सूरज चव्हाण होणार बाबा?, पत्नीचे बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो व्हायरल, नेमकं सत्य काय?

View this post on Instagram

A post shared by Jui Gadkari (@juigadkariofficial)

पोस्ट शेअर करत जुई म्हणाली, “गेले काही दिवस ‘ठरलं तर मग’ चे ४५ मिनीटांचे एपिसोड रोज सुरु आहेत. हे ऐकायला जरी “हो मग त्यात काय?” असं वाटलं तरी, ते रोज करणं खूपच अवघड आहे. रोजचा (सोम ते रवि) २२ मिनीटांचा भाग असला तरी पुर्ण युनीट अक्षरशः दिवस रात्र काम करत असतं. ॲक्टर्स घरी गेले तरी पोस्टप्रॅाडक्शनची मंडळी, एडिटर्स हे Round o clock शिफ्ट्स मध्ये काम करतात. मग रोज ४५ मिनीटचा एपिसोड करणं अजीबात सोप्पं नाही. पुर्ण युनीट या साठी अथक परिश्रम करतं. कधी चीडचीड होते. कधी रडारड. फक्त ॲक्टर्सचीच नाही तर डिरेक्शन, लाईटमेन, स्पॅाट, सेटींग, साऊंड, कॅमेरामेन हेअर मेकअप कॅासट्युम या सगळ्यांची डबल युनीटमध्ये तारांबळ ऊडते”.

आणखी वाचा – वयाच्या ४४ व्या वर्षी मराठी अभिनेत्रीने केलं दुसरं लग्न, साधेपणाने पार पाडला विवाहसोहळा, पतीही आहे कलाविश्वात सक्रिय

शेवटी तिने म्हटलं, “काहीही झालं तरी ध्येय एकच, एपिसोड थांबता कामा नये आणि अशातच जगाच्या वेगवेगळ्या भागात सुरु असलेल्या युध्द परिस्थितीत अडकलेल्या, मराठी भाषिकही नसलेल्या ईसराएलच्या प्रेक्षकांकडुन कौतुकाची थाप मिळते तेव्हा वाटतं “Its all worth it” आपण आपल्या मालिकेच्या माध्यामातुन अशा परिस्थितीत अडकलेल्या एका कुटुंबाला आनंद देऊ शकलो याचा मला खुप जास्त आनंद आहे. देव करो आणि ते सगळे कायम सुखरुप राहो”.

Tags: jui gadkarimarathi actressmarathi serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Munna Bhai Fame actor's Car Hits Two People
Entertainment

‘लगे राहो मुन्ना भाई’ फेम अभिनेत्याच्या कारची स्कूटरला धडक; दोन जण गंभीर जखमी

ऑगस्ट 18, 2026 | 2:05 pm
Govinda On Affair Rumours
Entertainment

“खरं प्रेम अस्तित्वात आहे का?”; कश्मीरा शाहच्या पोस्टने वेधलं चाहत्यांचं लक्ष, म्हणाली, “लग्न, प्रेम…”

ऑगस्ट 17, 2026 | 5:59 pm
Manjar Movie Poster Onkar Bhojane in lead role
Entertainment

तीन मित्र अन् मोठा गोंधळ; ‘मांजर’ चित्रपटाच्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, १८ सप्टेंबरला उलगडणार…

ऑगस्ट 13, 2026 | 5:18 pm
Swara Bhasker breaks silence on being trolled
Entertainment

“मुस्लिमाशी लग्न करून तुम्ही लठ्ठ आणि कुरुप झालात का?”, ट्रोलिंगवर भडकली अभिनेत्री, म्हणाली, “सेक्सी मुली…”

ऑगस्ट 12, 2026 | 10:19 am
Next Post
Disha vakani father passes away

दयाबेनला पितृशोक, ८४ व्या वर्षी नाटककार भीम वाकाणी यांचे निधन, लेकीवर होता खूप जीव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.