Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वात स्पर्धक मंडळी तुफान राडा करताना पाहायला मिळत आहेत. आणि या तुफान राड्यावर आळा घालण्यासाठी रितेश देशमुखच्या भाऊच्या धक्क्यावर त्यानं स्पर्धकांची चांगली शाळा घेतलेली पाहायला मिळाली. नुकत्याच झालेल्या भाऊच्या धक्क्यावर रितेशने टीम ए मधील स्पर्धकांची कान उघडणी केलेली पाहायला मिळाली. टीम ए मधील स्पर्धकांच्या चुका, त्यांच्याकडून केला जाणारा सततचा अपमान, वाद यांवर रितेशने परखडपणे भाष्य करत त्यांना सुनावलं. घराची कॅप्टन झाल्यापासून निक्कीच वागणं बदललंय इतकंच नव्हे तर पहिल्या दिवसापासून निक्कीची अरेरावी सुरु असताना आता रितेश देशमुखने निक्कीला जाब विचारत तिची शाळा घेतलेली पाहायला मिळाली.
रितेश निक्कीला म्हणाला की, “निक्की तुम्ही हलक्या कानाचे आहात आणि तुमची बुद्धी पण हलकीच आहे. तुम्हाला या घरातील काही मंडळी चालवत आहेत. तु चावी मारतात आणि तुम्ही चालू होता. चावीचं माकड असतं ना?”. रितेश यांनी निक्कीची शाळा घेत म्हटलं की, “टीम ए ही आहेच नाही. तर टीम एमध्ये आहे ते म्हणजे निक्की क्वीन आणि बाकी सगळे तिचे गुलाम. गुलाम एक अरबाज, गुलाम दोन वैभव, सावली त्या बाहेर बसल्यात त्या आणि असिस्टंट घनःश्याम.
पुढे तो म्हणाला, “काय म्हणाला होतात तुम्ही कर्मचारी. कर्मचारी म्हणजे काय?. तुम्ही या कामाला कमी लेखताय?. अहो प्रत्येक कामाला एक सन्मान असतो एक मान असतो. आपल्या देशात जर कर्मचाऱ्यांनी काम करणं सोडलं तर देश बंद पडेल. एखाद्या वेळेस या देशाला पंतप्रधान नसला तरी चालेल पण कर्मचारी नसेल तर देश बंद पडेल हे लक्षात घ्या तुम्ही. उगीच यथल सुटलं तोंड चालू ठेवता ते चूक आहे. तू जोकर आहेस, तू कर्मचारी आहेस, कोण आहात आपण?, काय बोलतोय?, कोणाला बोलतोय?”.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : जान्हवीची जेलमध्ये रवानगी, रितेश देशमुखने दिली मोठी शिक्षा, भडकत म्हणाला, “तुमची जागा…”
भडकलेल्या रितेशने पुढे असंही म्हटलं की, “अंकिताला पण तुम्ही म्हणालात तुझ्याकडे काम नाही म्हणून तू इथे आलीस. तर इथे असलेल्या सगळ्यांकडे काम आहे. तुमच्याकाठी काम आहे तरी तुम्ही इथे आलात. हे बोलणं शोभत का तुम्हाला?. मी खरंच कंटाळलो आहे तुम्हाला. एका शोमध्ये मी टॉप ३ ची होते इथे तुम्हीच बॉटममध्ये असाल. तुमचा प्रावास उलट्या दिशेने सुरु आहे. गेम सुधरा”.