Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वात सध्या सगळे स्पर्धक धुमाकूळ घालताना दिसत आहेत. अशातच रितेश देशमुखच्या भाऊच्या धक्क्याने साऱ्यांना धक्का दिला. ‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धकांची रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर चांगली शाळा घेतली. दमदाटी करणाऱ्या, अरेरावी करणाऱ्या या स्पर्धकांना त्यांची खरी जागा दाखवून दिली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भाऊच्या धक्क्यावर प्रेक्षकांना नवा ट्विस्ट पाहायला मिळाला. ‘सत्याचा पंचनामा’ या टास्कमध्ये स्पर्धकांनी इतर स्पर्धकांची अक्षरशः लायकी काढलेली पाहायला मिळाली. या टास्कमध्ये जान्हवी किल्लेकरने पॅडी कांबळेच्या अभिनय कारकीर्दीवर टीका केलेली पाहायला मिळाली.
तर निक्कीने पॅडीच्या अभिनयाला जोकर असं म्हटलं आहे. या सर्व अपमानाबाबत सोशल मीडियावर संतापाची लाट उसळलेली पाहायला मिळाली. सोशल मीडियावर प्रेक्षकांनी तसेच कलाकार मंडळींनी जान्हवीवर टीका करत त्यांना चांगलेच खडसावलेले दिसले. तसेच यंदाच्या भाऊच्या धक्क्यावर रितेशने जान्हवी व निक्कीची चांगली शाळा घेतली पाहिजे आणि त्यांची कान उघडणी केली पाहिजे अशी विनंती देखील केलेली दिसली. यानुसारच यंदाच्या भाऊच्या धक्क्यावर रितेशने जान्हवी व निक्कीची चांगली शाळा घेतलेली पाहायला मिळाली. इतकंच नव्हे तर जान्हवीला शिक्षा म्हणून त्यांना घराबाहेर काढत जेलमध्ये टाकलेलं दिसलं.
या सर्व प्रकरणावर सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी शेअर केलेली पोस्ट लक्षवेधी ठरत आहे. सुरेखा कुडची यांनी पोस्ट शेअर करत रितेश देशमुखचं कौतुक केलेलं पाहायला मिळत आहे. सुरेखा यांनी पोस्ट शेअर करत, “लव्ह यू रितेश भाऊ. आज शांतपणे झोप लागेल. भावा आज प्रत्येकाला त्याची जागा दाखवून दिलीत. प्रत्येकाच्या चुका दाखवून दिल्या. त्याबद्दल धन्यवाद. याचीच वाट पाहत होतो. घरातल्या कुठल्याही सदस्याशी माझं वैयक्तिक भांडण नाही पण जे दिसत होतं ते खूपच वाईट होतं. तुम्ही जेव्हा म्हणालात की, अरबाज – निक्की आणि ती बाहेर बसलेली जिचं नावही तुम्हाला घ्यायची इच्छा नाही. ते तिघं तुम्ही बोलत असताना हसत असतात हे खरं आहे. तुम्ही दिलेलं उत्तर लय भारी मी रितेश देशमुख आहे मला हलक्यात नाही घ्यायचं”.
पुढे सुरेखा यांनी असं म्हटलं की, “‘ए’ टीमला त्यांच्या चुकांबद्दल ऐकवणं गरजेचं होतं आणि ते तुम्ही योग्य शब्दातून त्यांना ऐकवलंत. बाकी ‘बी’ टीमची तारीफ करावी असंच ते खेळले आहेत. असा भाऊचा धक्का पाहायला नक्की आवडेल. लव्ह यु रितेश भाऊ”.