‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता वाईल्ड कार्ड स्पर्धकाची एण्ट्री झालेली पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च घर आता चर्चेत आलं आहे ते म्हणजे वाइल्ड कार्ड सदस्य म्हणून आलेल्या संग्राम चौगुलेमुळे. ‘बिग बॉस’च्या घरात एण्ट्री होताच संग्रामने त्याचा खेळ दाखवण्यास सुरुवात केली आहे. मनगटात ताकद, बोलण्यात वजन, वागण्यात कोल्हापुरी बाणा असलेल्या बलवान आणि आपल्या महाराष्ट्राची शान असलेल्या संग्राम चौगुलेच्या एण्ट्रीने स्पर्धकांचे धाबे दणाणले आहेत.(Bigg Boss Marathi Season 5)
या आठवड्यात बीबी करन्सी नसल्यामुळे विहिरीच्या टास्कमधून काही सदस्यांनाच सोयी-सुविधांचा उपभोग घेता येईल, असं बिग बॉस सांगतात. यावेळी ‘बिग बॉस’ यांनी विहिरीत जे पडतील ते सोई-सुविधा मिळण्यासाठी अपात्र ठरतील आणि ज्यांना विहिरीत ढकललं जाणार नाही त्यांना सोयी-सुविधा मिळतील, असे सांगितलं. हे कार्य वाईल्ड कार्ड सदस्य पार पाडणार असल्याचं बिग बॉस यांनी घोषित केलं. त्यानंतर संग्राम चौगुलेची वाईल्ड कार्ड एण्ट्री होते. सर्व सदस्यांची भेट घेत संग्राम सूरजला तुझ्यासाठीच आलोय असं सांगतो.
पुढे विहिरीच्या टास्कला सुरुवात होते. ‘बिग बॉस’ जोड्या तयार करतात आणि संग्रामला योग्य न वाटणाऱ्यांना तो विहिरीत ढकलेल आणि विहिरीत पडलेल्यांना आठवडाभर उकडलेलं जेवण मिळेल तसंच त्यांना बेड वापरता येणार नाही, असं सांगतात. शेवटी धनंजय, निक्की व अभिजीत त्यांच्यातील २ सदस्यांना ढकलायचं असा आदेश देतात. “मला कोणाचीच गरज नाही, मी एकटीच समर्थ आहे आणि माझ्या मेडिकल कंडिशनमुळे मी पाण्यात उडी मारु शकत नाही”, असं निक्की म्हणते.
आणखी वाचा – कधीच आई होऊ शकणार नाही ‘ही’ लोकप्रिय गायिका, दु:ख व्यक्त करत सांगितले कारण, म्हणाली, “अनेक आजार आहेत आणि…”
त्यावेळी संग्राम पुढे येतो आणि निक्कीला धक्का देत पाण्यात ढकलतो. तेव्हा निक्की जोरात किंचाळते. त्यानंतर निक्कीचा राग अनावर होतो. पाण्यातून बाहेर आल्यानंतर निक्की संग्रामला बोलते, “तू नाही माझ्याआधी घराबाहेर निघाला तर मी माझं नाव बदलेन”. त्यानंतर निक्की संग्रामबद्दल अरबाजला सांगत म्हणते, “त्याची अक्कल तळपायात आहे, कवडीची अक्कल नाही आहे, नुसता बॉडी घेऊन आला आहे”, असं म्हणते.