Bigg Boss Marathi 5 Updates : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वात टिक टॉक स्टार सूरज चव्हाणच्या एण्ट्रीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. सूरजच्या एण्ट्रीनंतर सुरुवातीला त्याला घरातील स्पर्धकांनी व काही प्रेक्षक मंडळींनीही त्याला या स्पर्धेसाठी योग्य नसल्याचं म्हटलं. तर घरातील काही स्पर्धक सूरजला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे तर काही त्याला मदत करतानाही दिसत आहेत. सूरज अजून ‘बिग बॉस’च्या घरात रमलेला दिसत आहे. त्याला हा खेळ नेमका कसा आहे ते कळलेलं नाही त्यामुळे पहिल्याच आठवड्यात तो नॉमिनेशन टास्कमध्येही आहे. दरम्यान नॉमिनेशनंतर आता सूरज त्याचं मत मांडताना दिसत आहे.
सूरजने नुकतंच निक्कीवर निशाणा साधलेला पाहायला मिळत आहे. स्पर्धकांना एक आठवडा बेडवर बसण्याची व झोपण्याची परवानगी नाही असं सांगितलं आहे. तर चुकून निक्की बेडवर बसते हे सूरज पाहतो. आणि सूरज निक्कीला म्हणतो की, ” “तू सुद्धा टेकून बेडवर बसली होती, ते मी पाहिलं. असं करु नका नाहीतर ते आम्हाला भोगावं लागेल”. हे ऐकून निक्की म्हणते, “हो. मी बसले होते पण मी लगेच उठले आणि आपल्याला बेड वर बसायची संमती नाही आहे पण आपण सोफ्यावर बसू शकतो”.
त्यानंतर आता सूरज व निक्की यांच्यातील संभाषणाचा नवा प्रोमो समोर आला आहे. यावेळी निक्की सूरजला असं म्हणते की, “तू मला चॅलेंज करतो ना, तू असा विचार पण नाही करु शकत की, तू माझं असं रुप बघशील ना?”, हे ऐकून सूरज शांत बसतो. त्यानंतर सूरजला ‘बिग बॉस’ एका बंद खोलीत बोलावतात आणि सांगतात की, “सूरज न घाबरता खेळायचं”. सूरजला ‘बिग बॉस’ यांनी खंबीर होण्यास आणि हा खेळण्यास धीर दिलेला आहे. यावर सूरज असं म्हणतो, “आता मी कोणाला घाबरणार नाही. कारण जो घेतो टीम तो होतो किंग. कारण मी आहे गोलीगत टॉपचा किंग”, असं म्हणत तो त्याच्या युनिक स्टाइलने पुन्हा एकदा ‘बिग बॉस’च्या घरात एण्ट्री घेतो.
आणखी वाचा – प्रतिमाला खुश ठेवायला सुभेदार कुटुंबाची धावपळ, तर तन्वी-अर्जुनमधील जवळीकता सायलीला खटकणार?, मालिकेत मोठं वळण
आता सूरज चव्हाण पेटला असून तो घरातील स्पर्धकांना त्याचा इंगा दाखवणार का?, ‘बिग बॉस’ यांनी सूरजला दिलेला पाठिंबा इतर स्पर्धकांना भारी पडणार का?, निक्कीची अरेरावी खपवून घेतली जाणार का? हे पाहणं येणाऱ्या भागात रंजक ठरेल.