सध्या सर्वत्र ‘बिग बॉस मराठी’ची चर्चा सुरु आहे. यंदा ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एकापेक्षा एक वरचढ स्पर्धक पाहायला मिळत आहे. अभिनेत्री, गायक, सोशल मीडिया एन्फ्लुएंसर, रॅपर अशा विविध क्षेत्रात कार्यरत असणारे सर्व सदस्य प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहेत. या रिऍलिटी शोमध्ये अभिनेता व स्प्लिट्सविलाची जान असलेल्या अरबाज पटेलच्या एण्ट्रीने साऱ्यांचं लक्ष वेधलं. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून अरबाज सामील झाला आहे. अरबाज पटेलने त्याच्या स्टाईल व स्वॅगने अनेकांची मन जिंकली आहेत. (arbaz patel girlfriend post)
अशातच आता काही दिवसांपूर्वी अरबाजच्या एका कृतीने अनेकांची मन दुखावली. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून कीर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील हे स्पर्धक बाहेर पडले. यावेळी घराबाहेर पडताना पुरुषोत्तम दादा पाटील यांनी संतांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केला आणि जाता जाता त्यानं पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकली. हा जय जयकार सर्व स्पर्धक करताना दिसले मात्र यावेळी अरबाज पटेल हा जयजयकार ऐकून अगदी स्तब्ध उभा होता. त्याच्या तोंडून एकही अक्षर फुटलं नाही हे पाहून प्रेक्षकांनी त्याला चांगलंच ट्रोल केलेलं पाहायला मिळालं.

यानंतर आता अरबाज पटेलची गर्लफ्रेंड लिझा बिंद्राने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अरबाज व लिझा या दोघांच्या सोशल मीडियावर एकमेकांबरोबरचे अनेक व्हिडीओ, फोटो आहेत. दोघांनीही त्यांचे प्रेम सोशल मीडियावरुन जाहीरही केलेलं पहायला मिळत आहे. अशातच ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अरबाज गेल्यानंतर आता लिझाने त्याच्यासाठी केलेली पोस्ट लक्षवेधी ठरत आहे.
लिझाने सोशल मीडियावर एक स्टोरी पोस्ट करत, “माझ्याकडे कदाचित सर्व उत्तरे नसतील, परंतु मी नेहमीच तुझ्या पाठीशी उभे राहण्याचे वचन देते आणि तुझ्याबरोबर सर्व आव्हानांना सामोरे जाण्याचे वचन देते. एकत्रितपणे आपण जग जिंकू शकतो”, असं म्हणत अरबाजला पाठिंबा दर्शविला आहे. अरबाज सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या घरात खेळत असणारा खेळ पाहून अनेकजण नाराजीचा सूर उमटवताना दिसत आहेत. तसेच अरबाज व निक्की यांच्यात प्रेमाचे बंध फुलतानाही दिसत आहे.