शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मी मेल्यावर कुणी कुणी यायचं याची यादी…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला, “मानसिकरित्या खचतो…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 18, 2024 | 6:35 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg boss marathi fame pushkar jog shared Instagram story about his death and grab attention know what he exactly said

पुष्कर जोगचे स्वत:च्या मरणाबाबत गंभीर भाष्य, इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली भावनिक पोस्ट, नक्की काय म्हणाला?

‘जबरदस्त’ चित्रपटामुळे अभिनेता पुष्कर जोग घराघरांत लोकप्रिय झाला. आजवर त्याने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘बिग बॉस’मराठी या शोमुळे पुष्करला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. ‘बिग बॉस मराठी’नंतर प्रसिद्धीझोतात आलेला पुष्कर हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो आपली अनेक मतं स्पष्टपणे मांडत असतो. सामाजिक, राजकीय तसंच सिनेसृष्टीतील विविध घडामोडींबद्दलही अनेकदा तो व्यक्त होत असतो.  सोशल मीडियावर पुष्करचा बऱ्यापैकी वावर असून अनेकदा त्याच्या सोशल मीडिया  पोस्टची चर्चा होत असते. (Pushkar Jog Instagram Story)

अशातच पुष्करने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. पुष्करने ही पोस्ट शेअर केल्याने साऱ्यांच्या नजरा त्याच्या पोस्टकडे लागल्या आहेत. वैयक्तिक आयुष्यात आलेले चढ-उतार, काही कटू अनुभव आणि फसवणूक यामुळे त्रस्त असलेल्या पुष्करने ही पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्याने स्वतःच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमधून त्याने त्याच्या मरणाबाबतही भाष्य केलं असून “मी गेल्यावर कुणी कुणी यायचं याची यादी देऊन जाईन” असं म्हटलं आहे. त्याचबरोबर “अजून १२ वर्षे आहेत” असं भाष्यही त्याने या पोस्टमधून केलं आहे.    

आणखी वाचा – गणपती बाप्पासमोर लीला प्रेमाची कबुली देणार, लालबागच्या भरगर्दीत झालं शूट, मंडपात आली तेव्हा…

इन्स्टाग्रामवर  स्टोरीद्वारे पुष्करने असं म्हटलं  आहे की, सगळ्यांसाठी सगळं केलं. खरा वागलो. जेव्हा जेव्हा मानसिकरित्या खचतो तेव्हा आपले कोण कोण हे शोधतो. आई आणि मुलगी. नशिबवान आहेत ते सर्व ज्यांना काळजी घेणारे मित्र आहेत. जिवंत असताना एकटाच राहीन बहुतेक. मी गेल्यावर कुणी कुणी यायचं यांची यादी देऊन जाईन मी. उगाच किती वाईट वाटलं याचा आव आणून येऊ नका”.

आणखी वाचा – Deadpool & Wolverine आता ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज, कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या…

यापुढे पुष्करने असं म्हटलं आहे की, “अजून १२ वर्षे आहेत. राष्ट्रीय आणि ऑस्कर पुरस्कार जिंकायचा आहे. आई-बाबांसाठी लीजेंड (Legend) होऊनच जाईन, आई आणि फेलीशा तुमच्यावर खूप प्रेम आहे. त्या सर्वांना धन्यवाद ज्यांनी त्यांचे खरे रंग दाखवले”. दरम्यान, पुष्करने ही पोस्ट नक्की कुणाबद्दल केली आहे? हे सांगितले नाही. पण या पोस्टमुळे त्याने अनेकांना कोड्यात टाकले आहे.   

Tags: marathi actorpushkar jogPushkar Jog Instagram Story
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
muzammil ibrahim  On deepika padukone
Entertainment

तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

जून 6, 2025 | 11:02 am
Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Next Post
maharashtrachi hasyajatra america tour

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांची पॅरिसच्या एअरपोर्टवरच मांडी घालून रिहर्सल, साधेपणाचं सर्वत्र कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.