शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुझी पत्नी तुला सोडून गेली त्याचं काय?”, पुष्कर जोगला नेटकऱ्याने प्रश्न विचारताच भडकला, म्हणाला, “मी कोणाच्याही बापाचं…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 30, 2024 | 11:56 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss Marathi fame marathi actor Pushkar Jog reacted to netizen question about his wife's and personal life statement.

बायको व खासगी आयुष्याबद्दल नेटकऱ्याने केलेल्या वक्तव्यावर भडकला पुष्कर जोग

सध्या सर्वत्र एका शोची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे आणि हाअ शो म्हणजे ‘बिग बॉस मराठी’… ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व सुरु होऊन आता जवळपास एक महिना पूर्ण झाला आहे. या घरात गेल्या अनेक दिवसांपासून अनेक ट्विस्ट येत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वावर बिग बॉस मराठीचे माजी स्पर्धकही त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. ‘बिग बॉस मराठी’मध्ये सहभाग घेतल्यानंतर पुष्कर जोगचे वैयक्तिक आयुष्य चांगलंच चर्चेत आलं होतं. पुष्कर व त्याची पत्नी जास्मिन ब्रह्मभट्ट यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाल्याच्या अनेक अफवा सोशल मीडियावर झाल्या होत्या. मात्र या साऱ्यावर पुष्करने अनेकदा त्याची प्रतिक्रिया दिली आहे. याबद्दल त्याने सोशल मीडियावर उठत असलेल्या अफवांमध्ये तथ्य नसल्याचं सांगितलं आहे.

अशातच एका नेटकऱ्याने पुन्हा एकदा त्याच्या खासगी आयुष्याबद्दल भाष्य केलं आहे आणि या नेटकऱ्याला अभिनेत्याने चांगलंच सुनावलं आहे. पुष्करने नुकतीच ‘एंडेमोल शाइन इंडिया’ला मुलाखत दिली. यावेळी त्याला ‘बिग बॉस मराठी’नंतर त्याच्या आयुष्यात काही बदल झाले का असं विचारण्यात आले. याचे उत्तर देत त्याने असं म्हटलं की, “बिग बॉसमुळे माझं आयुष्य बदललं. वाईट काळ सुधारला. थोडं यश मिळालं. माणूस म्हणून लोकांची व कुटुंबाची किंमत कळली. सोशल मीडियापलीकडचं आयुष्य काय असतं ते बिग बॉसमुळे कळलं. या शोने मला माझं दुसरं आयुष्य दिलं”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “तिला मोकळीक दिली तर आपली दहशत संपेल”, अरबाज-जान्हवीचा आर्या विरोधात गेम, म्हणाला, “आपली वाट लावेल…”

याच व्हिडीओखाली एका नेटकऱ्याने कमेंट करत असं म्हटलं आहे की, “तुझ्या वैयक्तिक आयुष्यात तुझी पत्नी तुला सोडून गेली त्याचं काय? तुझं व्यावसायिक आयुष्य छान झालं पण वैयक्तिक आयुष्यात काय झालं तेही सांगा”. नेटकऱ्याच्या या प्रश्नाला उत्तर देत पुष्करने असं म्हटलं आहे की, “तुझ्या आईवडिलांशीही असंच बोलतोस का? माझं वैयक्तिक आयुष्य आहे. मी कोणाच्या बापाचं खात नाही. कळलं का फुकणीच्या”.     

आणखी वाचा – “मुलगी आई-वडिलांवरचं ओझं”, KBC 16 मध्ये स्पर्धकाच्या वक्तव्यावर भडकले अमिताभ बच्चन, म्हणाले, “नोकरी न करणाऱ्या स्त्रिया…”

दरम्यान, पुष्कर जोग बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील सदस्यांच्या खेळावर सोशल मीडियावर व्यक्त होत असतो. अनेकदा त्याने इतर सदस्यांबरोबर चूकीच्या पद्धतीने वागल्याने निक्की तांबोळीवर टीका केल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळाले आहे. आता पाचव्या पर्वात बिग बॉसच्या घरात नवीन कोणता कल्ला होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

      

Tags: Big Boss Marathi Pushkar Jog Newspushkar jogPushkar Jog Wife News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

soldier duty over marriage
Social

हळद फिटली नसतानाही जवान लग्नाच्या तिसऱ्या दिवशी कामावर रुजू, आई-वडील भावुक तर पत्नीचा खंबीर पाठिंबा, मन हेलावणारा व्हिडीओ

मे 9, 2025 | 11:22 am
Akshay Kelkar Haldi Ceremony
Entertainment

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला लागली हळद, घरीच कुटुंबियांसह सेलिब्रेशन, मराठी कलाकारांची हजेरी

मे 9, 2025 | 10:56 am
Which Cooking Oil Is Good
Lifestyle

‘या’ तेलामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिकाधिक वाढतंय, जेवणात कोणतं तेल वापरणं अधिक उत्तम?, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार…

मे 8, 2025 | 7:00 pm
Video Viral From Pakistan
Social

“आम्ही भारताला थांबवूच शकलो नाही आणि…”, पाकिस्तान नागरिकाकडूनच भारताचा जयजयकार, पाक सैन्याचं सत्य समोर आणत…

मे 8, 2025 | 4:00 pm
Next Post
30 august 2024 friday daily horoscope marathi news bhavishyavani astrology 12 zodiac sign know more

30 August Horoscope : मेष, कर्क व मीन राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस तोट्याचा, नोकरी-व्यवसायात येऊ शकतात अडथळे, अधिक जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.