शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi Season 5 Winner Suraj Chavan : “बोललो होतो ट्रॉफी मीच जिंकणार”, विजेता ठरल्यानंतर सूरज चव्हाणचं वक्तव्य, म्हणाला, “जिद्द होती आणि…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 7, 2024 | 9:47 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi Season 5 Winner Suraj Chavan expressed his feelings after winning the show

Bigg Boss Marathi Season 5 चा विजेता झाल्यानंतर सूरज चव्हाणने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत

Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan : गेल्या काही दिवसांपासून सगळे मराठी प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत आहेत, तो क्षण अखेर पार पडला आहे. नुकताच ‘बिग बॉस मराठी ५’चा ग्रँड फिनाले सोहळा पार पडला आहे. १०० दिवस चालणारा हा शो यंदा मात्र अवघ्या ७० दिवसांतच संपला. मात्र या ७० दिवसांतही या शोने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं. यंदाच्या पर्वाने ‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासातील सर्व रेकॉर्ड्स मोडले आणि नॉन-फिक्शनच्या शोमध्येही सर्वोच्च टीआरपी आणत बाजी मारली. एकूण १६ जणांच्या एन्ट्रीने सुरुवात झालेला ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन अवघ्या सहा जणांवर येऊन ठेपला. (Bigg Boss Marathi Season 5 Winner Suraj Chavan)

अशातच नुकत्याच पार पडलेल्या महाअंतिम सोहळ्यात सर्वांच्या लाडक्या सूरज चव्हाणने बाजी मारली आणि ‘बिग बॉस मराठी ५’च्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. शोचा होस्ट रितेश देशमुखने ‘बिग बॉस मराठी ५’च्या विजेतेपदाची घोषणा करत सूरज चव्हाणचे नाव जाहीर केलं आहे. सूरजला बिग बॉसच्या ट्रॉफीसह रोख रक्कम १४ लाख ६० हजार आणि ईलेक्ट्रिक बाइकही मिळाली आहे. विजेता झाल्यानंतर सूरजने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

यावेळी त्याने असं म्हटलं की, “मी बोललो होतो ट्रॉफी मीच जिंकणार, माझी जिद्द होती आणि माझा विश्वास होता आणि टी ट्रॉफी मी जिंकली आहे. ॐ नम: शिवाय, आई मरी माता, हर हर महादेव, मला माहीत होतं अभिदादा माझ्याबरोबर शेवटपर्यंत असणार”. विजेता झाल्यानंतर सूरजला अनेक बक्षिसे मिळाली आहेत. त्याला घेऊन चित्रपट करणार असल्याचेही केदार शिंदे यांनी सांगितले आहे. त्यामुळे साहजिकच सूरजच्या चाहत्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे.

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’चा महाविजेता सूरज चव्हाण ठरला असून या शोच्या उपविजेतेपदाचा बहुमान गायक अभिजीत सावंतला मिळाला आहे. सूरजने ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री केल्यानंतर अनेकांनी नाकं मुरडली होती. या शोमध्ये त्याला का घेतलं गेलं? अशा अनेक प्रतिक्रिया आल्या होत्या. मात्र या शोचे विजेतेपद पटकावत अनेक नकारात्मक प्रतिक्रिया करणाऱ्यांना सूरजने सणसणीत उत्तर दिले आहे. 

Tags: Abhijeet Sawant Bigg Boss Marathi Season 5 WinnerBigg Boss Marathi Season 5 Winner Suraj ChavanSuraj Chavan Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Winner
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Bigg Boss Hindi 18 Grand Premiere Updates

Bigg Boss Hindi 18 Grand Premiere : चाहत पांडे, अविनाश मिश्रा, शहजादा धामी, शिल्पा शिरोडकर यांची ‘बिग बॉस १८’च्या घरात एंट्री, कोण ठरणार वरचढ?  

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.