Bigg Boss Marathi 5 : सध्या छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो ‘बिग बॉस मराठी’चे नवीन पर्व चांगलेच चर्चेत आहे. नुकतंच झालेल्या ‘बिग बॉस’च्या ‘भाऊचा धक्का’मध्ये रितेश देशमुखने घरातील स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. कोणाचे काय चुकले? आणि कोणी काय करायला हवे? या सर्व गोष्टी रितेशने सांगितल्या. दर आठवड्याच्या रविवारी एलिमेशन पार पडते आणि या पर्वाचे दुसरे एलिमिनेशन आज पार पडले असून यात एलिमिनेशनमध्ये निखिल दामले हा स्पर्धक घराबाहेर पडला आहे. नवीन पर्वातील तीन आठवड्यानंतर निखिल घराबाहेर पडला आहे. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)
घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी सूरज, योगिता, निखिल व अभिजीत हे चार स्पर्धक नॉमिनेशन प्रक्रियेत होते. यापैकी सूरज व अभिजीत हे सुरक्षित झाले असून निखिल व योगिता हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत होते. यापैकी निखिलचा प्रवास संपला आहे. या घरातील निखिलचा गेम काही दिवस खराब असल्याने तो लवकरच घराबाहेर पडणार असल्याच्या चर्चा वर्तवल्या जात होत्या आणि या चर्चा अखेर खऱ्या ठरल्या आहेत.
या नॉमिनेशन टास्कमध्ये ‘बिग बॉस’ने एक नवीन ट्विस्ट आणत या घरातून आज आणखी एक स्पर्धक घराबाहेर जाणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे हा दूसरा स्पर्धक कोण? याविषयी सर्वांना धाकधुक लागून राहिली होती. अशातच ‘बिग बॉस’ने या घरातील दुसऱ्या एलिमिनेशनची घोषणा केली आहे. त्यामुळे या दुसऱ्या एलिमिनेशनमध्ये घरातून योगिता चव्हाण ही स्पर्धक घराबाहेर पडली आहे. गेले काही दिवस ती या घरात तिला राहायचे नसल्याचे म्हणत होती. मला ही ट्रॉफी नको असा म्हणत मला घरी जायची इच्छा आहे असं म्हणत तिने मला या घरातून बाहेर जायचे असल्याचे विनंती ‘बिग बॉस’ला केली होती आणि अखेर तिचा या घरातील प्रवास संपला आहे.
दरम्यान, ‘भाऊचा धक्का’मध्ये घरातील सर्व स्पर्धकांनी एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप केले. एकमेकांची तक्रार सांगितली. तसेच एकमेकांची उणीधुणीही काढली. अशा सर्वच स्पर्धकांचा रितेशने समाचार घेतला. सर्व स्पर्धकांचे ऐकून घेतले त्याचबरोबर सर्व स्पर्धकांना ऐकवलेदेखील. तसंच या घरात एक नवीन खोलीही उघडण्यात आली. यात घरातील स्पर्धकांनी एकमेकांविषयीची केलेली चुगली ऐकवून दाखवण्यात आली. यामुळे सर्वांना एकमेकांविषयीचे खरे रंग दिसले. तसंच आजच्या भागात प्रेक्षकांच्या प्रतिक्रियाही रितेशने ऐकवून दाखवल्या.