शनिवार, मे 10, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : जान्हवीला जेलमध्ये टाकताच सुरेखा कुडची यांची लक्षवेधी पोस्ट, रितेशचं कौतुक केलं, म्हणाल्या, “प्रत्येकाला जागा दाखवून दिली आणि…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 25, 2024 | 12:33 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5

जान्हवी-निक्कीची शाळा घेताच सुरेखा कुडची यांची लक्षवेधी पोस्ट, रितेश देशमुखचे आभारही मानले

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वात सध्या सगळे स्पर्धक धुमाकूळ घालताना दिसत आहेत. अशातच रितेश देशमुखच्या भाऊच्या धक्क्याने साऱ्यांना धक्का दिला. ‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धकांची रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर चांगली शाळा घेतली. दमदाटी करणाऱ्या, अरेरावी करणाऱ्या या स्पर्धकांना त्यांची खरी जागा दाखवून दिली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भाऊच्या धक्क्यावर प्रेक्षकांना नवा ट्विस्ट पाहायला मिळाला. ‘सत्याचा पंचनामा’ या टास्कमध्ये स्पर्धकांनी इतर स्पर्धकांची अक्षरशः लायकी काढलेली पाहायला मिळाली. या टास्कमध्ये जान्हवी किल्लेकरने पॅडी कांबळेच्या अभिनय कारकीर्दीवर टीका केलेली पाहायला मिळाली.

तर निक्कीने पॅडीच्या अभिनयाला जोकर असं म्हटलं आहे. या सर्व अपमानाबाबत सोशल मीडियावर संतापाची लाट उसळलेली पाहायला मिळाली. सोशल मीडियावर प्रेक्षकांनी तसेच कलाकार मंडळींनी जान्हवीवर टीका करत त्यांना चांगलेच खडसावलेले दिसले. तसेच यंदाच्या भाऊच्या धक्क्यावर रितेशने जान्हवी व निक्कीची चांगली शाळा घेतली पाहिजे आणि त्यांची कान उघडणी केली पाहिजे अशी विनंती देखील केलेली दिसली. यानुसारच यंदाच्या भाऊच्या धक्क्यावर रितेशने जान्हवी व निक्कीची चांगली शाळा घेतलेली पाहायला मिळाली. इतकंच नव्हे तर जान्हवीला शिक्षा म्हणून त्यांना घराबाहेर काढत जेलमध्ये टाकलेलं दिसलं.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “देशाला पंतप्रधान नसला तरी चालेल पण…”, घनःश्यामला कर्मचारी म्हणणं निक्कीला पडलं महागात, रितेश भडकला, म्हणाला, “देश बंद…”

View this post on Instagram

A post shared by Surekha Kudchi (@surekha_kudachi)

या सर्व प्रकरणावर सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी शेअर केलेली पोस्ट लक्षवेधी ठरत आहे. सुरेखा कुडची यांनी पोस्ट शेअर करत रितेश देशमुखचं कौतुक केलेलं पाहायला मिळत आहे. सुरेखा यांनी पोस्ट शेअर करत, “लव्ह यू रितेश भाऊ. आज शांतपणे झोप लागेल. भावा आज प्रत्येकाला त्याची जागा दाखवून दिलीत. प्रत्येकाच्या चुका दाखवून दिल्या. त्याबद्दल धन्यवाद. याचीच वाट पाहत होतो. घरातल्या कुठल्याही सदस्याशी माझं वैयक्तिक भांडण नाही पण जे दिसत होतं ते खूपच वाईट होतं. तुम्ही जेव्हा म्हणालात की, अरबाज – निक्की आणि ती बाहेर बसलेली जिचं नावही तुम्हाला घ्यायची इच्छा नाही. ते तिघं तुम्ही बोलत असताना हसत असतात हे खरं आहे. तुम्ही दिलेलं उत्तर लय भारी मी रितेश देशमुख आहे मला हलक्यात नाही घ्यायचं”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : निक्कीसमोर आणले तिच्याच टीममधील स्पर्धकांचे खरे चेहरे, रितेश देशमुखने अरबाज, जान्हवीपासून केलं सावध, ऐकून धक्का बसला आणि…

पुढे सुरेखा यांनी असं म्हटलं की, “‘ए’ टीमला त्यांच्या चुकांबद्दल ऐकवणं गरजेचं होतं आणि ते तुम्ही योग्य शब्दातून त्यांना ऐकवलंत. बाकी ‘बी’ टीमची तारीफ करावी असंच ते खेळले आहेत. असा भाऊचा धक्का पाहायला नक्की आवडेल. लव्ह यु रितेश भाऊ”.

Tags: bigg boss marathibigg boss marathi 5surekha kudachi on riteish deshmukh
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Arijit Singh
Entertainment

मनाचा मोठेपणा! अरिजित सिंगच्या हॉटेलमध्ये सर्वसामांन्यांना इतक्या रुपयांत पोटभर जेवण, गायकाच्या निर्णयाचं कौतुक

मे 10, 2025 | 12:41 pm
akshay kelkar wedding
Entertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, शाही विवाहसोहळ्याची झलक समोर, लूकची जोरदार चर्चा

मे 10, 2025 | 11:26 am
Pawandeep Rajan  Health
Entertainment

अपघातानंतर पवनदीपवर पुन्हा शस्त्रक्रिया, आठ तास सुरु होतं ऑपरेशन, आता परिस्थिती अशी की…

मे 10, 2025 | 10:48 am
Akshay Kelkar Wedding
Entertainment

शुभमंगल सावधान! ‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नबंधनात, लग्नातील पहिला फोटो समोर

मे 9, 2025 | 6:08 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5

Bigg Boss Marathi : "घरात पण असं बोलता का?", वैभव चव्हाणच्या अरेरावीपणावर रितेश भडकला, म्हणाला, "तुमचा आवाज…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.