Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वाने प्रेक्षकांना अगदी खिळवून ठेवलं आहे. दिवसेंदिवस हा शो अधिकाधिक रंजक बनत आहे. या शोच्या पहिल्या भागापासून सूरज चव्हाण आणि पॅडी कांबळे या दोघांची मैत्री चर्चेत आहे. टास्कदरम्यान आणि घरात पॅडी सूरजला समजावून घेत असल्याचे अनेकदा पाहायला मिळालं आहे. रितेश देशमुखनेही भाऊच्या धक्क्यावर सवाल केला होता की, पॅडी सर्वाधिक काळजी कोणाची घेतात? तेव्हा सर्वांनी मिळून सूरजचे नाव घेतले होते. शिवाय सूरजला लिहिता-वाचता येत नसल्याने पॅडी-अंकितासह सर्व बी टीम सूरजला नेहमी मदत करताना दिसली आहे. मात्र शुक्रवारच्या भागात पॅडी व सूरजमध्येही काही कारणामुळे मतभेद झाले. ज्याबद्दल सूरजला वाईट वाटलं. (Bigg Boss Marathi 5 Suraj Chavan)
गुरुवारी झालेल्या भागाच्या शेवटी ‘बिग बॉस’ने एक टास्क दिला होता. तेव्हा त्या टास्कदरम्यान, पॅडी टास्क समजावून सांगत असताना सूरज मध्ये बोलत असतो. त्यामुळे पॅडी त्याला अडवतात आणि मध्ये बोलू नको असं म्हणतात. यामुळे सूरज दुखावला जातो आणि नाराज होतो. तेव्हा अंकिता त्याची समजूत काढते. अशातच शुक्रवारच्या भागात अभिजीतने साडी नेसून केलेल्या टास्कमध्येही डान्स करत असताना सूरज मध्ये मध्ये येतो आणि यामुळेही पॅडी त्याला अडवतात. यामुळे आधीच दुखावलेला सूरज आणखी नाराज होतो. यावेळी दुखावलेला सूरज आता एकटा गेम खेळणार असल्याचे भाष्य करतो.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 : “सूरजला शहाणपणा शिकवू नको”, अंकितावर भडकले प्रेक्षक, म्हणाले, “त्याला समजून सांगा पण…”
यावेळी सूरज सर्वांसमोर असं म्हणतो की, “मला जान्हवी आणि पॅडीदादा दोघे म्हणाले मागे हो… अभिजीतला नाचूदे. म्हणजे आम्ही इथे काय मध्ये मध्ये करायला आलो आहोत का? असं बोलल्यावर कुणाला राग येणार नाही. चार माणसांत कुणी बोललं की मला राग येतो. खूप म्हणजे खूप राग येतो. मी खूप सहन करुन घेत आहे. माझं डोकं खूप गरम होतं. पण मी खूप कंट्रोल करतो. मला थेट सांगत जा तू शांत बस. तू बोलू नको. मला सगळे म्हणतात गप्प बस पण मला पण ‘बिग बॉस’च्या घरात बोलायला पाठवलं आहे”.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi चा टीआरपी वाढला, रितेश देशमुखचं यश पाहून बायको भारावली, म्हणाली, “नवा रेकॉर्ड बनवत….”
यापुढे तो असं म्हणतो की, “चालतंय!… मी शांत बसतो. आता मी एकटाच खेळणार… एकटाच नडणार… आता माझा राग शेवटपर्यंत नाही जाणार. आता हा शेर बघा काय करतो. मी चिडणार नाही. दादा-काका म्हणूनच बोलणार. पण आता मी कोण आहे हे गेममध्ये दाखवतो आणि गेममधला माझा पॅटर्न पण दाखवतो”. यावेळी चिडलेल्या सूरजची घरातील सर्व सदस्य समजूत काढण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा अभिजीतही त्याला लहान भावासारखं समजावतो आणि त्याची मस्करीही करतो.