शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ट्रॉफी बारामतीतच! Bigg Boss Marathi 5 चा विजेता ठरला सूरज चव्हाण, मिळाले इतके लाख रुपये, बक्षिसांचा वर्षाव

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 6, 2024 | 8:56 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Winner

Bigg Boss Marathi Season 5 च्या विजेतेपदावर सूरज चव्हाणने कोरलं नाव, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

Suraj Chavan Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Winner : गेल्या काही दिवसांपासून सगळे मराठी प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत आहेत, तो क्षण अखेर पार पडला आहे. नुकताच ‘बिग बॉस मराठी ५’चा ग्रँड फिनाले सोहळा पार पडला आहे. १०० दिवस चालणारा हा शो यंदा मात्र अवघ्या ७० दिवसांतच संपला. मात्र या ७० दिवसांतही या शोने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं. यंदाच्या पर्वाने ‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासातील सर्व रेकॉर्ड्स मोडले आणि नॉन-फिक्शनच्या शोमध्येही सर्वोच्च टीआरपी आणत बाजी मारली. एकूण १६ जणांच्या एन्ट्रीने सुरुवात झालेला ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन अवघ्या सहा जणांवर येऊन ठेपला. एकमेकांना टक्कर आणि चुरशीची लढत देत या सहा जणांनी शोच्या अंतिम सोहळ्यापर्यंत बाजी मारली आहे. (Suraj Chavan Bigg Boss Marathi 5 Grand Winner)

अंकिता प्रभू वालावलर, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर आणि निक्की तांबोळी हे सहा जण ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचे अंतिम दावेदार बनले. या सहा जणांनीदेखील एकमेकांना टक्कर देत आपला इथपर्यंतचा पल्ला गाठला. अशातच नुकत्याच पार पडलेल्या महाअंतिम सोहळ्यात सर्वांच्या लाडक्या सूरज चव्हाणने बाजी मारली आणि ‘बिग बॉस मराठी ५’च्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. शोचा होस्ट रितेश देशमुखने ‘बिग बॉस मराठी ५’च्या विजेतेपदाची घोषणा करत सूरज चव्हाणचे नाव जाहीर केलं आहे. सूरजला बिग बॉसच्या ट्रॉफीसह रोख रक्कम १४ लाख ६० हजार आणि ईलेक्ट्रिक बाइकही मिळाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

गावाकडचं साधं राहणीमान आणि शैक्षणिक ज्ञान नसलेल्या सूरजला ‘बिग बॉस’च्या घरातील सुरुवातीचे काही दिवस खूपच कठीण गेले. मात्र, कालांतराने त्याला खेळ कसा खेळायचा याची समज आली. यादरम्यान, सूरजला पॅडी, अंकिता, डीपी, अभिजीत या संपूर्ण ‘बी टीम’ने सुरुवातीपासूनच खंबीर साथ दिली. त्याला वेळोवेळी खेळ समजावून सांगितला आणि या खेळात हळूहळू तरबेज होत सूरजने अंतिम सोहळ्यापर्यंत आपली मजल मारली आणि इतकंच नव्हे तर आता त्याने या शोच्या विजेतेपदावरही आपलं नाव कोरलं आहे.

‘बिग बॉस मराठी’चा महाविजेता सूरज चव्हाण ठरला असून या शोच्या उपविजेतेपदाचा बहुमान गायक अभिजीत सावंतला मिळाला आहे. तसंच सूरजच्या विजयामुळे त्याच्या असंख्य चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असेल. सूरजने ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री केल्यानंतर अनेकांनी नाकं मुरडली होती. या शोमध्ये त्याला का घेतलं गेलं? अशा अनेक प्रतिक्रिया आल्या होत्या. मात्र या शोचे विजेतेपद पटकावत अनेक नकारात्मक प्रतिक्रिया करणाऱ्यांना सूरजने सणसणीत उत्तर दिले आहे. दरम्यान, सूरजच्या या विजयावर घरातील व घराबाहेरील अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.

Tags: Bigg Boss Marathi 5 Winner Suraj ChavanBigg Boss Marathi Season 5 Winner Suraj ChavanSuraj Chavan Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Winner
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Suraj Chavan Upcoming Movie

मोठी घोषणा! केदार शिंदे सूरज चव्हाणला घेऊन चित्रपट करणार, 'झापूक झुपूक' असणार नाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.