Suraj Chavan Upcoming Movie : ‘बिग बॉस मराठी’च्या यंदाच्या पर्वाने विशेष धुमाकूळ घातलेला पाहायला मिळाला. यंदाचं हे पर्व विशेष गाजलं. आज या पर्वाचा महाअंतिम सोहळा अगदी दणक्यात सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या या पर्वातील विजेतेपदावर सूरज चव्हाणने नाव पटकावले. यंदाच्या या ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर सूरज चव्हाणने नाव कोरले. सूरज चव्हाण या पर्वाचा विजेता होताच कलर्स मराठीचे सर्वेसर्वा केदार शिंदे यांनी केलेल्या एका घोषणेने साऱ्यांचेच लक्ष वेधले आहे. केदार शिंदे यांनी केलेली ही घोषणा ऐकून साऱ्यांना भावुक व्हायला झालं आहे, कारण यंदाच्या पर्वातील सूरज चव्हाणबाबत केदार शिंदे यांनी खूप मोठी घोषणा केली असल्याच समोर येत आहे.
सूरज चव्हाणचा ‘बिग बॉस’च्या घरातील खेळ हा सगळ्यांनी पाहिला. सुरुवातीला खेळ कळत नसला तरी बिग बॉसच्या घरात त्यानं माणसं ओळखत प्रेक्षकांची मन जिंकली. सूरजला सोशल मीडियावर भरभरुन पाठिंबा मिळालेला पाहायला मिळाला आणि आता सूरज केदार शिंदे दिग्दर्शित एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे समोर आले आहे. खुद्द केदार शिंदे यांनी ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या महाअंतिम सोहळ्यात याबाबतची घोषणा केली असल्याचे समोर आले आहे.
आणखी वाचा – अभिजीत व सूरज ठरले Bigg Boss Marathi चे टॉप २ सदस्य, कोण पटकावणार मानाची ट्रॉफी, उत्सुकता वाढली
‘झापूक झुपूक’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात सूरज चव्हाण महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याचे समोर आलं आहे. चित्रपटात याशिवाय कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्तात ठेवण्यात आले आहे. केदार शिंदे यांनी बाईपण भारी देवा या ब्लॉक बस्टर चित्रपटानंतर ‘झापूक झुपूक’ या त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.