शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi च्या घरात पॅडीला भावुक झालेला पाहून सहअभिनेत्रीने सांगितला जुना किस्सा, म्हणाली, “आम्ही प्रयोगाला जात होतो तेव्हा…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 15, 2024 | 12:38 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 Paddy Kamble emotional actress Vishakha Subhedar shared memory

Bigg Boss Marathi 5 च्या घरात पॅडी कांबळे यांना भावुक झालेला पाहून विशाखा सुभेदार यांनी एक जुना किस्सा सांगितला आहे.

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात काही सदस्यांना उकडलेलं अन्न खाण्याची शिक्षा देण्यात आली होती. ही शिक्षा देण्यामागचे कारण देत ‘बिग बॉस’ने असं म्हटलं होतं की, “आज महाराष्ट्रात एक वेळच्या अन्नासाठीदेखील चूल पेटणं शक्य होतं नाही. या परिस्थितीची झलक मिळावी म्हणून आपण केवळ उकडलेलं अन्न खा”. ‘बिग बॉस’चे हे बोलणे ऐकून घरातील सर्वच सदस्य भावुक झाले होते. मात्र यावेळी पंढरीनाथ कांबळे यांना आपले अश्रू अनावर झाले. मात्र पॅडी यांना अश्रू कं अनावर झाले याबद्दल त्यांची मैत्रीण व सहकलाकार अभिनेत्री विशाखा सुभेदारने नुकतीच पोस्ट शेअर केली आहे. “आपला पॅडी का रडला?” असं म्हणत विशाखा यांनी पंढरीनाथ यांचा एक किस्सा सांगितला आहे. (Vishakha Subhedar Shared Memory)

विशाखा यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पॅडी यांचा रडतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि असं म्हटलं आहे की, “आपला पॅडी का रडला? खरं सांगू का… यातला हा माणूस त्याच्या जवळच्या अनेक मित्र-मंडळींनी पाहिलाय. अत्यंत प्रामाणिक आणि भावनाप्रधान, मदत करणारा, दयाशील असा आमचा पॅडी. एक किस्सा आठवला, असंच आम्ही प्रयोगाला जात होतो. रस्ता चुकला म्हणून बस थांब्यावर असलेल्या एका बाईला रस्ता विचारला, तर तिने रस्ता सांगताना अरे तुम्ही तर माझ्याच घरावरुन जाणार, माझ्या घरावरुन पुढे गेलात ना की, मग डावीकडे वळलं की मग पुढे थोडं उजवीकडे वळले की तुमचा ठिकाणी. असं म्हणाली. त्यावर पॅडी म्हणाला की अहो काकी तुमचं घर आम्हाला कुठे माहिती आहे. हसलो. त्यावर तिने हसून पुन्हा एकदा रस्ता सांगितला आणि आम्ही थोडं पुढे गेलो”.

View this post on Instagram

A post shared by Vishakha Subhedar (@subhedarvishakha)

आणखी वाचा – “सगळं संपल्याची जाणीव झाली आणि…”, ‘ठिपक्यांची रंगोळी’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याला झाला होता ब्रेन हॅमरेज, म्हणाला, “बरा झालो पण…”

यापुढे विशाखा यांनी असं म्हटलं की, “पुढे गेल्यावर त्यांनी मध्येच गाडी थांबवायला सांगितली. मला म्हणाला अगं आपण त्या बाईच्या घरावरनं जाणार मग आपण तिला का घेतलं गाडीत? आम्ही मागे गेलो आणि त्या बाईला त्यांनी गाडीत बसवलं. संपूर्ण प्रवासात आमच्या गप्पा चालल्या होत्या. तिचा नवरा त्यांची मासेमारीची बोट, त्यावरचे कामगार सगळं. तिने काही आम्हा दोघांना ओळखलं नव्हतं. तिचं आपल दर काही वाक्यानंतर चालू होतं ‘बाई पहिल्यांदा एवढ्या मोठ्या गाडीत बसले… कधीच नाही बसले गं गाडीत.. नुसत्या गाड्या तोंडासमोरुन गाड्या जायच्या,बसले कधीच नव्हते आज पहिल्यांदा बसले.. ते पण एवढ्या मोठ्या गाडीत…’. मग तिला तिच्या घराजवळ उतरवलं”.

आणखी वाचा – Video : अन् ‘बिग बॉस मराठी’च्या घरातले सगळेच सदस्य रडू लागले, पण नेमकं झालं काय? पाहा हा भावुक प्रोमो

पुढे विशाखा यांनी पॅडीबद्दल असं म्हटलं की, “तिचा आनंद पाहून पॅडीला आनंद होत होता. आपल्या आईला सोडल असं त्याला वाटत होतं. त्यानंतर पुढच्या प्रवासात आम्ही दोघही अबोल. त्याने त्याच्या आईला आणि मी माझ्या बापाला कवटाळून प्रवास केला. असा आहे पॅडी! दुसऱ्याच्या सुखदुःखात साथ देणारा, त्याची शिकवण्याची पद्धत अशीच आहे. त्याचे टोमणे बोल अमृताची फळ वाटतात कारण तो फार कमी वेळा तसं बोलतो आणि गरज पडली तरच. सुरज पहिल्या दिवसापासून बेडवर पॅडीच्या बाजूला झोपला. त्यावेळी तर त्यांची ओळखही नव्हती.. हा आलाय? पासून आता त्याची काळजी घेणे त्यात फक्त माया आहे. त्याच्या वागण्या-बोलण्यात कुठला स्वार्थ असता तर तो आज कुठल्याकुठे असता”.

Tags: Bigg Boss Marathi 5 Paddy KamblePaddy Kamble EmotionalVishakha Subhedar shared memory
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Madhurani Prabhulkar New Home

Video : ‘आई कुठे…’ फेम अरुंधतीने विलेपार्ले घेतलं स्वत:चं हक्काचं घर, मुलीसह केला प्रवेश, म्हणाली, "लेकीच्या साथीने…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.