Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चं यंदाचं पर्व सध्या विशेष गाजताना दिसत आहे. हे चर्चेत असलेलं नवं पर्व गेल्या महिनाभरापासून चर्चेत आलं आहे. यंदाच्या या पर्वात एका सदस्याची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. हा स्पर्धक म्हणजे निक्की तांबोळी. हिंदी ‘बिग बॉस’मधून आलेल्या या स्पर्धकाने अगदी पहिल्या दिवसापासून ‘बिग बॉस मराठी’च्या घरात राडा घालायला सुरुवात केली. अगदी पहिल्या आठवड्यापासून निक्कीची चर्चा सुरु आहे. वर्षा उसगांवकरांबरोबरचं भांडण, अरबाज पटेलची लव्हस्टोरी, टीम ए बरोबर झालेलं भांडण यामुळे निक्की चांगलीच चर्चेत राहिली.
‘बिग बॉस मराठी’मध्ये निक्कीची एक खास स्टाइलही चर्चेत आली. ‘बाईssss हा काय प्रकार आहे?’ हा डायलॉग तिच्या भांडणाबरोबरच चांगलाच गाजतोय. तिच्या या डायलॉगची क्रेझ प्रेक्षकांमध्येही आहे. कारण तिच्या त्या डायलॉगवर आता चक्क पुणेकर थिरकले असल्याचं पाहायला मिळालं. स्पर्धकांशी बोलताना निक्कीने तिच्या खास शैलीत ‘बाईSSS’ हा शब्द उच्चारला होता. बाईSSS’, ‘बाईSSS हा काय प्रकार’ हे निक्कीचे डायलॉग आता सोशल मीडियावरही हिट झाले आहे. त्यानंतर तिच्या या शब्दावर अनेक मीम बनले.
आणखी वाचा – देवोलीना भट्टाचार्जीने फ्लॉन्ट केलं बेबी बंप, आता दिसत आहे अशी, नेटकरी म्हणाले, “तू खूप…”
पुण्याच्या दहीहंडीत
— Vinit Vaidya (@hifrom_vinit) August 28, 2024
निक्कीच्या “बाईSsss”
डायलॉगवर पुणेकरांचे ठुमके…#Nikkitamboli #BiggBossMarathi pic.twitter.com/rPeVnZt5C3
बिग बॉस प्रेमींमध्ये निक्कीचं हे वाक्य चांगलंच व्हायरल झालं आणि याचीच प्रचिती अलीकडेच पार पडलेल्या दहीहंडी उत्सवात पाहायला मिळाली. सर्वत्र दहीहंडी उत्सव अगदी दणक्यात साजरा करण्यात आला. यावेळी अनेक ठिकाणी डीजेवर गोविंदा पथकं थिरकताना पाहायला मिळाली. डीजेवर मराठी गाणं वाजत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘बिलनशी नागीन निघाली’चं रिमिक्स व्हर्जन ऐकू येत असतानाचं प्रत्येक ओळीनंतर निक्कीच्या ‘बाईssss’चं रीमिक्स करण्यात ऐकायला मिळालं. चाहत्यांचा हा धमाल करतानाच व्हिडीओ निक्कीच्या काही फॅन पेजवरुनदेखील शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ निक्की तांबोळीला टॅग करत इन्स्टाग्रामवर शेअर केला. निक्कीची ही हवा सगळीकडेच पाहायला मिळत आहे. सध्या टीम ए व अरबाजबरोबरच्या तुटलेल्या नात्यामुळे निक्की चर्चेत आली आहे. आजच्या भागात तर अरबाज व निक्की दोघेही रडताना दिसले.