शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “आता मी तुला काय सांगणार नाही”, सूरजवर का भडकले पॅडी?, अंकितानेही काढली समजूत पण…; नातं तुटणार?

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 20, 2024 | 11:51 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 new promo Paddy Kamble angry on Suraj Chavan see the details

Bigg Boss Marathi 5 मध्ये सूरज चव्हाणवर भडकले पॅडी कांबळे, नवीन प्रोमो व्हायरल

 Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता आठवा आठवडा सुरु झाला आहे. दिवसेंदिवस या घरातील खेळ व खेळाबरोबर घरातील नातीही बदलतानाचे पाहायला मिळत आहे. बिग बॉस मराठीच्या घरात सुरुवातीच्या काही दिवसांत झालेल्या मैत्रीत आता कुठे तरी दुरावा येतोय की काय? असं चित्र पाहायला मिळत आहे. ग बॉस मराठी’च्या घरात सूरज चव्हाण हा अतिशय स्ट्रॉंग प्लेअर असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याला टास्क कळायला वेळ लागत असला तरी तो टास्क पूर्ण ताकदीने खेळतो. घरातील टास्कबद्दल अंकिता व पॅडी त्याला वेळोवेळी समजावत असतात.  (Bigg Boss Marathi 5 New Promo)

बिग बॉस मराठीच्या घरात सूरज व पॅडी यांचे अनोखे नाते आहे आणि या अनोख्या नात्याचे दर्शन वेळोवेळी प्रेक्षकांनाही झाले आहे. मात्र आता सूरज व पॅडी यांच्यात काही कारणामुळे बिनसलं आहे आणि याचाच राग येऊन सूरजने पॅडी यांच्याविषयी गैरसमज बाळगला आहे. कलर्स मराठीच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे ‘बिग बॉस मराठी’च्या आगामी भागाचा एक प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे, ज्यातून सूरज व पॅडी यांच्यात मतभेद झाले असल्याचे पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – “स्वत: जसं खेळायचं तसं खेळते”, सूरजची समजूत काढणाऱ्या अंकितावर भडकली सुप्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली, “दुसऱ्यांना अडवते आणि…”

‘बिग बॉस मराठी’च्या गुरुवारच्या भागात एका टास्कदरम्यान, सर्वजण सराव करत असताना सूरज त्यांच्यामध्ये बोलतो. याचाच राग येत पॅडी त्याला “मध्ये बोलू नको” असं म्हणत ओरडतात आणि यामुळे सूरज दुखावलो जातो. दुखावलेला सूरज अंकिताजवळ येऊन आपलं मत व्यक्त करतो. तेव्हा अंकिता त्याची समजूत काढतात. याचबद्दल सूरज असं म्हणतो की, “मी माझं सांगितलं. मी बोलत असताना ते मध्ये बोलले म्हणून मी बोललो. नाही तर मी असं मध्ये कुणाला काही बोलत नाही”.  

आणखी वाचा – सुबोध भावेच्या लेकाची फुटबॉल स्पर्धेत ‘सुवर्ण’ कामगिरी, अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना, कौतुक करत म्हणाला, “तू आणि तुझी संपूर्ण टीम…”

या नवीन प्रोमोमध्ये पॅडी सूरजची समजूत काढतात. मात्र तो समजूत घेत नाही. त्यामुळे पॅडी त्याला असं म्हणतात की, “मला माफ कर. तुला मी ओरडलो. पण इथून पुढे तू काय गडबड करणार असशील तर मी तुला काही सांगणार नाही. तुला वागायचं आहे तसं वाग”. त्यामुळे सूरज आणखी दुखवला जातो. त्यामुळे आता पॅडी व सूरज यांच्यातील बॉण्ड तुटणार का? की अंकिता सूरजलाअ समजावत त्याची समजूत काढेल. हे आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  

Tags: bigg boss marathi 5paddy kamblePaddy Kamble angry on Suraj ChavanSuraj Chavan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
dalljiet kaur got threatened

“मी माझ्या पतीबरोबर खुश…” दलजित कौरला निखिल पटेलच्या गर्लफ्रेंडने दिली धमकी, म्हणाली, “तुझ्याविरोधात…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.