Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या यंदाच्या नवीन पर्वाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. या नवीन सीझनने आतापर्यंत ५० हुन अधिक दिवसांचा टप्पा पार केला असून या घरात आता फक्त आठ सदस्य उरले आहेत. त्यामुळे आता अंतिम लढतीसाठी या स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. त्यामुळे या घरात सुरुवातीला मित्र असणारे आता एकमेकांचे शत्रू बनायला सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यामध्ये अरबाज पटेलला घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यामुळे निक्कीच्या टीममधील फक्त दोन जण आहे शिल्लक राहिले आहेत. निक्की तांबोळीचे या घरातील प्रत्येक सदस्याबरोबर अनेक वाद झालेले पाहायला मिळाले. प्रत्येक सदस्याबरोबर तिचे काही ना काही कारणावरुन वाद झाले.
निक्कीने बऱ्याचदा सांगितले आहे की, तिची मैत्री ही अरबाज आणि अभिजीत यांच्यासोबत होती. मात्र आता अरबाज घराबाहेर गेल्यामुळे ती एकटी पडली असून यात तिला अभिजीतची साथ मिळत आहे. मात्र आता या दोघांमध्येही काही कारणाने वाद होणार आहे. याबद्दलचा एक नवीन प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कलर्स मराठीने शेअर केलेल्या नवीन प्रोमोमध्ये निक्की-अभिजीतचे भांडण पाहायला मिळत आहे. या नवीन प्रोमोमधून अभिजीत-निक्की यांच्या मैत्रीत फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे.
या प्रोमोमध्ये निक्की अभिजीला असं म्हणते की, “मीच म्हणाली होती की अभिजीत होईल कॅप्टन, पण याने अंकिताला कॅप्टन बनवलं”. यावर अभिजीत म्हणतो की, “आमच्यामध्ये लोकशाही आहे, तुमच्यामध्ये डिक्टेटरशिप (हुकूमशाही) होती”. यावर निक्की म्हणते की, “तू माझी आता सटकावली आहे, मी हायहाय झाली आहे”. यावर अभिजीत म्हणातो की, “तू गेममधे पण लोकांच्या भावनांचा खेळ केला आहेस”. यावर निक्की त्याला उत्तर देते की, जर तुला मला वाईट दाखवायचं असेल तर आजपासून माझ्याशी बोलू नको”.
आणखी वाचा – 24 September Horoscope : मीन, कर्क,व तूळ या राशींसाठी मंगळवारचा दिवस शुभ, तुमच्या नशिबात काय? जाणून घ्या…
या नवीन प्रोमोमधून त्यांच्यात नक्की कोणत्या कारणांमुळे बिनसले आहे ते कळत नाही. पण निक्की तिचा या घरातला अरबाजनंतरचा एक मित्रही गमावणार की काय असा प्रश्न पडला आहे. दरम्यान, या आठडव्यात ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून बाहेर जाण्यासाठी आठही सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता यापैकी कोण अंतिम टप्प्यात जाणार आणि कोण मागे राहणार? हे लवकरच पाहायला मिळणार आहे.