Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या यंदाचा नवीन सीझन पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहेत. यंदाच्या सीझनमध्ये सेलिब्रिटींपासून नेत्यांपर्यंत आणि गायकांपासून ते अगदी गावखेड्यातले सोशल मीडिया एन्फ्लुएंसर्स सामील झाले आहेत. त्यामुळे ‘बिग बॉस मराठी’च्या या नवीन सीझनने सर्वांचे भरभरून मनोरंजन केलं. मात्र १०० दिवस चालणारा हा शो आता काही कारणामुळे ७० दिवसच असणार आहे. येत्या ६ ऑक्टोबर रोजी या शोचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. त्याआधी बिग बॉस घरातील सदस्यांची आणि घराबाहेरील प्रेक्षकांची इच्छा पूर्ण करत आहे. (Rakhi Sawant in Bigg Boss Marathi 5)
‘बिग बॉस मराठी’च्या घरात नुकताच फॅमिली स्पेशल भाग पार पडला. यामुळे घरातील सदस्यांची आपल्या कुटुंबियांना भेटण्याची इच्छा पूर्ण झाली. अशातच राखी सावंतची या घरात एण्ट्री होण्याची प्रेक्षकांची इच्छाही पूर्ण झाली आहे. काही दिवसांपूर्वी घरातील स्पर्धक निक्की तांबोळी आणि तिच्या टीमने घातलेला गोंधळ पाहून प्रेक्षक राखी सावंतला या शोमध्ये पाठवा अशी मागणी करत होते. सोशल मीडियावर यासंबंधित अनेक पोस्ट व्हायरल होत होत्या आणि अखेर आता प्रेक्षकांची ही इच्छा पूर्ण झाली आहे. बिग बॉस मराठी च्या घरात राखी सावंतची एण्ट्री झाली आहे.
आणखी वाचा – शेवटी बापच तो! लेकींना पाहून स्वत:ला सावरु शकला नाही पॅडी, एकमेकांना घट्ट मिठी मारली तेव्हा…
कलर्स मराठीने वाहिनीने नुकताच त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ‘बिग बॉस मराठी’च्या घरात राखी सावंतची एण्ट्री झाल्याचे पाहायला मिळते. सदस्यांना भेटायला आणि त्यांना खास सल्ले द्यायला ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘ड्रामाक्वीन राखी सावंत’ची एण्ट्री झाली आहे. घरात येताच ‘बिग बॉस’ला राखी म्हणते की, “मी राखी सावंत तुमची पहिली बायको” त्यानंतर राखीची नजर निक्की तांबोळीवर पडते आणि ती निक्कीला म्हणते की, “सस्ती राखी सावंत. आता घरात चालणार माझंच ठणाणा… निक्की तांबोळी सोडून येणार तुला अंबोली”
राखी सावंतच्या एण्ट्रीमुळे प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटलं आहे असं म्हणायला हरकत नाही. अशा अनेक प्रतिक्रियाही बिग बॉस प्रेमींनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, राखीला बघताच निक्कीच्या तोंडचे पाणी पळाले आहे. कुणाचं काही ऐकून न घेणारी निक्की आता राखी सावंत पुढे कशी टिकणार? राखी पुढे तिचा निभाव लागणार का? हे पाहणे रंजक ठरणार आहे. यासाठी अनेकांनी उत्सुकताही व्यक्त केली आहे