Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’ हा रिऍलिटी प्रत्येक वादग्रस्त शोपैकी एक आहे. या शोच्या प्रत्येक सीझनने आजवर प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. सध्या ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ ची सर्वत्र चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. यंदाचं हे पर्व खूप खास असून विशेष गाजताना दिसत आहे. यंदाच्या या पर्वात अनेक कलाकार मंडळींसह रॅपर, गायक, रील स्टार अशा विविध क्षेत्रातील मंडळींना खूप मोठा प्लॅटफॉर्म मिळाला असल्याचं पाहायला मिळालं. वाईल्ड कार्ड स्पर्धक धरुन तब्बल १७ स्पर्धकांनी यंदाच्या ‘बिग बॉस’ मध्ये प्रवेश केला. आता घरात एकूण आठ स्पर्धक उरले आहेत.
‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून चालू होत्या. अखेर ‘बिग बॉस’ने यावर अधिकृतरीत्या घोषणा करत या चर्चांना उत्तर दिलेलं पाहायला मिळालं. शंभर दिवसांऐवजी हा सीझन फक्त १० आठवड्यांचा म्हणजेच एकूण ७० दिवसांचा असेल. ‘बिग बॉस’ची घोषणा ऐकून घरातील सगळ्याच सदस्यांना धक्का बसला होता. अनेकांना शेवटपर्यंत सीझन ७० दिवसांत संपणार यावर विश्वास बसत नव्हता. मात्र, ‘बिग बॉस’ने महाअंतिम सोहळ्याची तारीख जाहीर करत याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.
आणखी वाचा – बार्बी थीम बेडरुम, प्रशस्त हॉल, आकर्षक इंटेरियर अन्…; आतून असं आहे मायरा वायकुळचं घर, पाहा Inside Video
येत्या ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’चा अंतिम सोहळा थाटामाटात पार पडणार असल्याचं समोर आलं आहे. केवळ १२ दिवस शिल्लक राहिलेले असताना आता ‘बिग बॉस’मराठीच्या घरात स्पर्धक मंडळी धुमाकूळ घालताना दिसत आहे. ट्रॉफीसाठी स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत होताना पाहायला मिळत आहे. अशातच ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ यांनी स्पर्धकांना टास्कचा बाप महाचक्रव्ह्यू बाबत सांगितलं आहे.
आणखी वाचा – इतकी सुंदर दिसते ‘सुख म्हणजे…’फेम अभिनेत्याची लेक, सहा महिने पूर्ण होताच दाखवला चेहरा, नावही आहे खूप खास
“‘बिग बॉस मराठी’च्या या सीझनच्या विजेत्याला मिळणाऱ्या बक्षिसाची रक्कम आहे २५ लाख रुपये. ही प्राइज मनी कमावण्यासाठी मी आणला आहे या सीझनमधील सर्व टास्कचा बाप महाचक्रव्ह्यू”, अशी घोषणा करत त्यांनी साऱ्या स्पर्धकांना धक्का दिला आहे. हा नेमका टास्क काय असणार आहे याकडे आता साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत.