Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या कॅप्टन्सी टास्क सुरू आहे. या आठवड्यात संपूर्ण घरात जंगलराज ही थीम असणार आहे. कॅप्टन्सी कार्यात दरवेळीप्रमाणे घरात दोन टीम्स पाडण्यात आल्या आहेत. ‘टीम ए’मध्ये निक्की, अरबाज, वर्षा, सूरज आणि धनंजय हे सदस्य आहेत. तर, ‘टीम बी’मध्ये जान्हवी, संग्राम, अंकिता, अभिजीत आणि पंढरीनाथ कांबळे हे सदस्य आहेत. हे सगळे सदस्य आता कॅप्टन्सीसाठी एकमेकांना भिडणार आहेत. या कॅप्टन्सी टास्कमध्ये आपल्याला आवडत नसलेल्या सदस्याच्या घरट्यात अंडा ताकत त्याला कॅप्टन्सीमधून बाद करायचे आहे आणि या टास्कमध्ये बुधवारच्या भागात दोन सदस्य बाद झाले आहेत, ते म्हणजे पॅडी व अंकिता. (Bigg Boss Marathi 5 New Promo)
पहिल्या फेरीत ‘ए टीम’कडून निक्की-अरबाज तर, ‘बी टीम’कडून जान्हवी-संग्राम खेळण्यासाठी जातात. मात्र, हा टास्क सुरू होण्यापूर्वी अरबाज संग्रामशी डील करतो. पहिल्या फेरीत आम्ही तुला बाद करणार नाही तू आम्हाला करू नकोस अशी डील यांच्यात होते. अरबाज अगदी सहजपणे जान्हवी, संग्रामला अडवतो आणि यामुळे निक्की अंडी उचलून अंकिता आणि पंढरीनाथ यांच्या घरट्यात टाकते. यामुळे हे दोघंही कॅप्टन्सी कार्यातून बाद होतात. अंकिता ही गोष्ट पाहिल्यावर संग्रामच्या खेळाविषयी शंका उपस्थित करते.
अशातच आता या नवीन टास्कचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे, ज्यात टास्कवरुन अरबाज अंकिततावर रागावल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये अरबाज निक्कीला आपण पहिल्या फेरीत आपण अभिजीत आणि संग्रामला बाहेर काढू असं म्हणत आहे. पण निक्की अरबाजच्या म्हणण्याप्रमाणे करत नाही. यामुळे अरबाजला राग अनावर होतो आणि तो असं म्हणतो की, “तिने मला धोका दिलाय”. निक्की “मी तिथे विसरली आणि मला पॅडी यांना नॉमिनेट करायचे होते” असं म्हणते. यावर अरबाज तिला प्रचंड रागात “इतक्या लवकर विसरते” असं म्हणत सोफ्यावर जोरजोरात मारू लागतो.
दरम्यान, अरबाजने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पुन्हा एकदा आक्रमक होण्याची ही काय पाहिलीच वेळ नाही. त्याने पुन्हा एकदा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रॉपर्टीवर आपला राग व्यक्त केला आहे. त्यामुळे आता त्याला काय शिक्षा होणार आहे का? किंवा निक्कीवरचा त्याचा विश्वास पुन्हा उडणार का? तसंच अरबाज त्याच्या रागावर नियंत्रण मिळवणार का? हे आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आगामी भागांसाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत.