रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : निक्कीवरुन अभिजीतला घरातल्यांनी केलं टार्गेट, डीपी दादानेही सवाल विचारला आणि…; गेम प्लॅनही फ्लॉप

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 30, 2024 | 7:04 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 new promo Abhijeet sawant targeted by the dhananjay powar and other housemates from Nikki tamboli.

Bigg Boss Marathi 5 मध्ये निक्कीमुळे धनंजयने अभिजीतला सुनावले बोल, नवीन प्रोमो व्हायरल

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या या पर्वाची सध्या प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा आहे. ‘बिग बॉस’च्या घरात काय घडतं, काय बिघडतं हे जाणून घ्यायला प्रेक्षकांना आवडतं. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील हा चौथा आठवडा वादाचा ठरत आहे. कारण ‘टीम ए’मध्ये फूट पडल्याचं दिसत आहे. निक्की तांबोळी आणि तिच्या ‘टीम ए’मधील सदस्यांची जोरदार भांडणं झाली आहेत. या घरात निक्की व वाद हे समीकरण काही नवीन राहिलेलं नाही. या घरातील भांडणासाठी निक्कीचे नाव कायमच अग्रेसर असल्याचे प्रेक्षकांनी पाहिले आहे. अशातच ती एक नवीन वाद उकरून काढणार आहे आणि या वादाचा एक प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (Bigg Boss Marathi 5 New Promo)

या नवीन प्रोमोमध्ये निक्की तिच्या बेडवर पडलेल्या टिश्यू पेपरवरुन नवीन वाद करणार आहे. बिग बॉसच्या कालच्या भागात आर्या व अरबाज या दोघांनी मिळून निक्कीवर सुड  काढण्यासाठी निक्की वॉशरुमला गेली असताना तिच्या बेडवर टिश्यूचे तुकडे अस्ताव्यस्त फेकले होते आणि यावरुनच आता निक्की वाद करणार आहे. या नवीन प्रोमोमध्ये सदस्यांमध्ये या टिश्यूवरुन बाचाबाची होतानाची पाहायला मिळणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – Navri Mile Hitlerla : एजे लीलाच्या प्रेमात, आजारी असताना रात्रभर उशाशी बसला अन्…; नातं फुलणार

नुकत्याच आलेल्या या नवीन प्रोमोमध्ये निक्की असं म्हणते की, “आम्ही टिश्यू जसे होते तसंच ठेवणार” यावर अरबाज असं म्हणतो की, “तिने जर पडलेले टिश्यू पेपर उचलले तर तिला कमीपणा वाटणार आहे का?” यावर अभिजीत असं म्हणतो की, “एकमेकांच्या कुरघोड्या करु नका”. यापुढे धनंजय अभिजीतला मध्येच टोकत असं म्हणतो की, “आम्ही कुरघोड्या करायला आलेलो नाही”. तसंच यापुढे डीपी अभिजीतला “तुला असं वाटतं नाही का निक्की चुकत आहे” असा प्रश्नही विचारतात.

आणखी वाचा – Video : प्रथमेश लघाटेने गवळण गाताच भर कार्यक्रमात उठून नाचू लागल्या आजी, ‘ते’ दृश्य पाहून बायकोही भारावली

यापुढे अभिजीत असं म्हणतो की, “जे चुकत आहेत त्यांनी स्वत: काय ते समजावं”. या संवादात काहीतरी झाल्यामुळे निक्की उठून जाते आणि जाता जाता  ती असं म्हणते की, “इतकंच कुणाला काही वाटत असेल तर स्वत:ची कामे स्वत: करा”. त्यामुळे आता या टिश्यूमुळे घरात कोणता नवीन इश्यू होणार आहे? हे आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसंच घरात नवीन कॅप्टन्सी टास्क रंगणार असून या टास्कमध्ये या घराला कोण नवीन कॅप्टन मिळणार? याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.     

Tags: abhijeet sawantbigg boss marathi 5the dhananjay powar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Saatvya Mulichi Saatvi Mulgi serial update new twist that Shatgriva will kill Indrani.

Saatvya Mulichi Saatvi Mulgi : विरोचकाकडून देवी आईची लेक इंद्राणीचा वध होणार?, अद्वैतलाही त्रास दिला अन्…; ट्वीस्ट पाहून प्रेक्षकही भडकले

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.